सोलापूर जिल्हा प्रशासनात तसेच सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये एक प्रकारे महिलाराज आल्याचे चित्र होते. सोलापूर जिल्हा प्रशासनात अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा प्रशासन अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, जिल्हा खणीकर्म अधिकारी यांच्यासह तब्बल चार तहसीलदार महिला अधिकारी होत्या. तसेच सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा वित्त अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी अशा मोठ्या पदांवर महिला अधिकारी कार्यरत आहेत.
दरम्यान मागील आठ दिवसात जिल्हा प्रशासनातील पुण्याहून सोलापूरला बदली होऊन आलेल्या दोन महिला अधिकाऱ्यांच्या बदल्या होऊन त्या पुन्हा पुण्याला गेल्या आहेत. उत्तर सोलापूर तहसीलदार पदी नियुक्ती झालेल्या उज्वला सोरटे यांची केवळ 26 दिवसात बदली झाली. त्या सोलापुरात येण्यासाठी धडपड करत होत्या त्या तहसीलदार पदावर नियुक्त सुद्धा झाल्या होत्या.
मात्र त्यांना निराश होऊन पुण्याला जावे लागले. ही बदली होण्यामागे अनेक कारणे आहेत. तसेच सोलापूर जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून डॉक्टर सीमा होळकर यांनी चार मार्च रोजी पदभार घेतला होता तत्कालीन पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांच्या जागेवरती आल्या. परंतु केवळ दहा दिवसात सीमा होळकर यांचीही बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागेवर पुन्हा संतोष सरडे यांना पदभार देण्यात आला. शनिवारी सरडे यांनी कार्यालयात जाऊन आपला पदभार स्वीकारला आहे.