Sunday, July 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘बिनशर्त’ची वेळ संपली, भाजपने मनसेला शिंगावर घेतलं, पानसेंविरुद्ध निरंजन डावखरे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 3, 2024
in maharashtra
0
‘बिनशर्त’ची वेळ संपली, भाजपने मनसेला शिंगावर घेतलं, पानसेंविरुद्ध निरंजन डावखरे
0
SHARES
88
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकसभा निवडणुकांच्या निकालास एक दिवस बाकी असतानाच विधानपरिषदेच्या तीन जागांसाठी उमेदवार जाहीर करत भाजपने चुरस वाढवली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपने विद्यमान विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरे यांनी अभिजीत पानसे यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवलं आहे. तिथे भाजप पाठिंबा देईल, अशी साहजिकच मनसेची अपेक्षा असावी. मात्र त्यानंतरही पानसेंविरोधात डावखरेंना मैदानात उतरवून भाजपने थेट मनसेलाच शिंगावर घेतलं आहे

कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे, मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. इतकंच नाही, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई शिक्षक मतदार संघासाठी शिवाजीराव नलावडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्याही विरोधात भाजपने शिवनाथ दराडेंना तिकीट देत महायुतीतच एकी नसल्याचं निकालाच्या आदल्याच दिवशी दाखवून दिलं आहे.

 

भाजपचे विधानपरिषद उमेदवार

मुंबई शिक्षक – शिवनाथ दराडे
मुंबई पदवीधर – किरण शेलार
कोकण पदवीधर – निरंजन डावखरे

 

कसा रंगणार सामना?

मुंबई शिक्षक – शिवनाथ दराडे (भाजप) विरुद्ध ज. मो. अभ्यंकर (ठाकरे गट) विरुद्ध शिवाजीराव नलावडे (अजित पवार गट)
मुंबई पदवीधर – किरण शेलार (भाजप) विरुद्ध अनिल परब (ठाकरे गट)
कोकण पदवीधर – निरंजन डावखरे (भाजप) विरुद्ध अभिजीत पानसे (मनसे)

 

लोकसभा निवडणुकांच्या प्रचारात राज ठाकरे यांना हिरीरीने सहभागी करुन घेतल्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघातील एका जागेसाठी तरी भाजप मनसेला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती. परंतु भाजपने मनसेच्या अपेक्षांना सुरुंग लावल्याचं चित्र आहे. राज ठाकरेंनी आधीच उमेदवार घोषित करुन भाजपच्या मनात काय चाललंय, याची चाचपणी केल्याची चर्चा होती. म्हणजे आगामी विधानसभा, महापालिका यांच्या जागावाटपाचा कुठलाच अधिकृत करार झाला नसताना, आपला मित्र आपल्या मदतीला येणार का, हे राज ठाकरे पडताळून पाहत असावेत, असं बोललं जात होतं. मात्र राज ठाकरे ज्यांना जवळचा मित्र मानतात, त्या शेलारांनीच मनसेविरोधात उमेदवार देण्याची भूमिका घेतल्याने महायुतीत सारं आलबेल नसल्याचं चित्र आधीच निर्माण झालं होतं.

 

राज ठाकरेंच्या विरुद्ध उमेदवार दिल्यास भाजपने केवळ त्यांचा वापर करुन घेतल्याचं चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. लोकसभेचं मतदान झालं असलं, तरी भाजपलाच भविष्यात त्याचा फटका बसेल, अशी चर्चा आहे.
Post Views: 44
Previous Post

अमूल दूध दोन रुपयाने महागले

Next Post

सांगलीच्या जागेचं निमित्त शोधून उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार, नितेश राणेंचा दावा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सांगलीच्या जागेचं निमित्त शोधून उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार, नितेश राणेंचा दावा

सांगलीच्या जागेचं निमित्त शोधून उद्धव ठाकरे मविआतून बाहेर पडणार, नितेश राणेंचा दावा

ताज्या बातम्या

सायकलच्या धक्क्यावरून वाद; उजनीत मध्यस्थी करणाऱ्या चुलत्याचा दगड मारून खून

July 5, 2026
खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

खुनेश्‍वर मध्ये शेती विषयी मोबाईल अ‍ॅप्सच्या प्रात्यक्षिकासाठी लोकमंगल कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थींनी बनल्या कृषीकन्या

July 5, 2026
विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

विमल कन्या प्रशाला, श्री शिवाजी मराठी विद्यालयात कृतज्ञता सोहळा  

July 5, 2026

सहाशे किमी सायकलिंग केवळ ३३.४७ तासात पूर्ण : आयर्नमॅन कैलास झोळगे यांचा विक्रम

July 5, 2026

बनावट दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे शासकीय नोकरी मिळविली – अहमद नगरच्या तरुणावर सोलापुरात फसवणुकीचा गुन्हा दाखल

July 5, 2026
पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

July 5, 2026

ध्यान केल्याने मन प्रसन्न राहते.. ओंकारेश्वर उटगे

July 5, 2026
मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

July 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0960059

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!