घोटका – कुरूळा – दिग्रस – वसंतनगर रस्त्यासाठी १८४ कोटी मंजूर – आ. डॉ. तुषार राठोड
▶ रावनकोळा – मुक्रामाबाद रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रूपये निधी मंजूर
मुखेड प्रतिनिधी :- ऍड रणजित जामखेडकर
मुखेड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या मागील अनेक वर्षांपासून नागरिकांची मागणी असलेला बहुप्रतिक्षित घोटका – हणुमंतवाडी – कुरूळा – दिग्रस (बु) – गुटुर – वर्ताळा वसंतनगर या रस्त्यासाठी हायब्रीड ऍन्यूईटी योजनेतुन १८४ कोटी तर रावणकोळा ते मुक्रामाबाद रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ५ कोटी रुपये मंजुरी मिळाली असल्याची माहिती मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आ. डॉ तुषार राठोड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली आहे.
भारताचे विकासपुरुष आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून मुखेडचे लोकप्रिय आ. डॉ तुषार राठोड यांच्या नेतृत्वाखाली ९ वर्षाच्या कालावधीत मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलला आहे.
रेणापूर- उदगीर – मुक्रमाबाद- देगलूर हा रस्ताही मंजूर झाला आहे. हे काम निविदा प्रक्रियेत आहे. लवकरच हे काम सुरु होणार आहे. परंतू तत्पूर्वी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या रस्त्याच्या दुरुस्ती कामासाठी ५ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघातील
प्रमुख जिल्हा मार्ग क्र. ५८ घोटका – हणमंतवाडी- कुरुळा- दिग्रस बु.- गुंटूर- वर्तळा- वसंतनगर रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी हायब्रीड अॅन्युईटी हॅम योजनेंतर्गत १८४ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कार्यारंभ आदेश लवकरच प्राप्त होणार आहे. लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. यातून या भागातील विकास कामांना गती मिळणार असल्याचीही माहिती कार्यसम्राट आ.डॉ. राठोड यांनी दिली.
यावेळी खुशाल पाटील उमरदरीकर, व्यंकटराव लोहबंदे,अशोकराव गज्जलवाड, राम सावकार पत्तेवार, बालाजी पाटील सकनुरकर, राजेश गजलवाड, हनुमंत पा.नरोटे ,किशोरसिंह चौहान, संग्रामअप्पा मळगे,
मिलिंदभाऊ लोहबंदे, सुधीरभाऊ चव्हाण, उत्तम बनसोडे, राजकुमार बामणे, सदानंद देवकते यांच्या सह आदी मान्यवर उपस्थित होते.