कायद्यातील बदला बद्दल पोलीस स्टेशनला पोलिसांकडून कार्यशाळा –
पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी नवीन कायदा कलमाची माहिती .
प्रतिनिधी/ जाफराबाद
न्यायप्रणालीमध्ये इंग्रजापासून चालत आलेल्या कायद्यात कसा बदल झाला यासाठी जाफराबाद पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी पोलीस स्टेशनला कार्यशाळा घेतली या कार्यशाळेमध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थ्यांना माहिती देताना त्यांनी सांगितले की १८६० मध्ये इंग्रजांच्या काळात लॉर्ड मेकॉले याने हे कायदे तयार केले होते यात एकूण ५११ कलमे असताना आता न्यायव्यवस्थेत ही कलमे कमी करून ३५ ७ कलमे ठेवली आहे तसेच भारतीय दंड संहिता हे नाव बदलून भारतीय न्याय संहिता असा बदल करण्यात आला अगोदरच्या दंड या शब्दास कट करून तिथे न्याय हा शब्द ठेवण्यात आला
तसेच नवीन झालेल्या कायद्यात महिला व लहान मुलांच्या कायद्यात अमुलाग्र बदल करून महिला बाबत जास्त जागृतकता ठेवण्यात आली आहे
यावेळी तर उपनिरीक्षक तायडे पो कॉ महेश वैद्य , प्रकाश पठाडे, उपनगराध्यक्ष,दामू अण्णा वैद्य सुरेश गवळी गोविंदराव पंडित, साहेबराव कानडजे, एकनाथ घाडगे ,जाफर मामू ,कदीर टेलर ,व न्यू हायस्कूल चे विद्यार्थी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .