बहिण लाडकी योजनेसाठीची रॅशन कार्डाची अट रद्द करा – श्रावणबाळ नरबागे
मुखेड / प्रतिनिधी :- ऍड. रणजित जामखेडकर
मुखेड तालुक्यातील महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी बहुतेक महिलांचे नावे राशन कार्ड नाहीत किंवा रॅशन कार्डात नावे समाविष्ट नाहीत.
मुखेड हा दुर्गम – डोंगराळ व मागास तालुका असून या तालुक्यातील बरेच महिला या महत्वकांक्षी योजनेपासून वंचित राहू शकता यामुळे सरकारने रॅशन कार्डाची अट शिथिल करावी व स्वस्त धान्य दुकानादर यांचा प्रमाणपत्र आधारे ऑनलाईन अर्ज घ्यावेत अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे तालुकाध्यक्ष श्रावण नरबागे यांनी मुखेडचे तहसिलदार राजेश जाधव यांच्या मार्फत सरकारकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर संपत कुंभारे, पिराजी गवलवड, बालाजी बनसोडे, विठ्ठल पाळेकर, रघुनाथराव जोंधळे मोटरगेकर, निवृती कटारे,मारुती वाघमारे उंद्रीकर, संजय सोनकांबळे,उत्तम पा.उंद्रीकर,गोविंद खतगावकर यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.