Thursday, March 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सर्व समाज घटकांसाठी चांगल्या मूलभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य – संजय बनसोडे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 7, 2024
in top news
0
सर्व समाज घटकांसाठी चांगल्या मूलभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य – संजय बनसोडे
0
SHARES
66
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लातूर, 7 जुलै (हिं.स.) जळकोट नगरपंचायत अंतर्गत वैशिषट्यपूर्ण योजनेतून लक्ष्मीपती बालाजी मंदिर सांस्कृतिक सभागृह आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृहाची उभारणी करण्यात आली आहे. या दोन्ही सभागृहांचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. सर्व समाज घटकांना चांगल्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले. याकरिता जळकोट तालुक्यातील विकास कामांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. यापुढेही आणखी निधी मिळवून देण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे ना. बनसोडे यांनी यावेळी सांगितले.

जळकोट नगरपंचायतच्या नगराध्यक्ष प्रभावती कांबळे, उपनगराध्यक्ष मन्मथअप्पा किडे, उदगीरचे उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जळकोटच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी रामदास कोकरे, गट विकास अधिकारी नरेंद्र मेडेवार, सार्वजानिक बांधकाम विभागाचे श्री. देशपांडे, श्री. कोरडे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठल चव्हाण, उपसभापती संतोष तीडके, नगरपंचायत गटनेते ऍड. तात्या पाटील, लक्ष्मीपती बालाजी मंदिर संस्थानचे रमाकांत रायवार यांच्यासह नगरपंचायतीचे नगरसेवक, समिती प्रमुख यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

जळकोट तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वॉटर ग्रीड योजनेत या तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तिरू नदीवर बॅरेजसची उभारणी करण्यात आली आहे. यासोबतच विविध समाजाच्या भवनांची उभारणी करण्यात येत असून महापुरुषांच्या पुतळ्यासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे. लिंगायत स्मशानभूमीच्या जमिनीचा विषय अंतिम टप्प्यात असून कोमटी समाज स्मशानभूमीसाठीही लवकरच निधी उपलब्ध होईल. तसेच जळकोट शहरातील प्रत्येक प्रभागातील पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे ना. बनसोडे यांनी सांगितले. तसेच जळकोट आणि उदगीर तालुक्यातील विविध विकास कामे अंतिम टप्प्यात असून या कामांचे लवकरच लोकार्पण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना जाहीर केल्या आहेत. शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी मोफत वीज देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घेण्याचे आवाहन ना. बनसोडे यांनी केले.

प्रारंभी ना. बनसोडे यांच्या हस्ते लक्ष्मीपती बालाजी मंदिर सांस्कृतिक सभागृहाची कोनशिला अनावरण करून लोकार्पण करण्यात आले. या सभागृहासाठी जळकोट नगरपंचायत अंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ५० लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला. यातून जवळपास २५५० चौरस फुटांचा सुसज्ज सभामंडप बांधण्यात आला आहे.

जळकोट शहरात नगरपंचायत वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक सभागृह बांधण्यात आले आहे. यामध्ये जवळपास १३५० चौरस फुटांचा सुसज्ज हॉल, प्रसाधनगृहे, पाणी पुरवठा, अंतर्गत पाणी व्यवस्था, इमारतीमध्ये आणि इमारत परीसरात विद्युतीकरण व प्रकाश योजना करण्यात आली आहे. या कामासाठी १ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. या सभागृहाचे ना. बनसोडे यांनी लोकार्पण केले.

Post Views: 19
Previous Post

जगन्नाथ रथयात्रेत हजारो भाविक सहभागी

Next Post

बँकेत विसरलेले लाखो रूपयांचे सोन्याचे दागिना खातेदाराला परत

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
बँकेत विसरलेले लाखो रूपयांचे सोन्याचे दागिना खातेदाराला परत

बँकेत विसरलेले लाखो रूपयांचे सोन्याचे दागिना खातेदाराला परत

ताज्या बातम्या

ए झा*#ट्या, तुझी एवढी हिंमत..भाजप नगरसेविकेकडून अर्वाच्य शिवीगाळ

March 26, 2026

शिवयोगी यात्रा महोत्सव आणि ज्ञानदासोही संगनबसव महास्वामीजी यांच्या १२० व्या जयंती उत्सव

March 26, 2026

इंडियन मॉडेल पॅरेट्स क्रिकेट लीग सिझन-१६

March 26, 2026
राज्य मंत्रिमंडळ विस्तारात सचिन कल्याणशेट्टींची ‘एंट्री’? 

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात सचिन कल्याणशेट्टींची ‘एंट्री’? 

March 25, 2026
हिंगुलांबिका प्राथमिक शाळेत वार्षिक बक्षीस वितरण

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेत वार्षिक बक्षीस वितरण

March 25, 2026
नालंदा तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी आम्रपाली गाडे

नालंदा तरुण मंडळाच्या अध्यक्षपदी आम्रपाली गाडे

March 25, 2026
सोळा गावांना नीरा देवधर धरणाचे पाणी देण्याची आग्रहाची मागणी

सोळा गावांना नीरा देवधर धरणाचे पाणी देण्याची आग्रहाची मागणी

March 25, 2026

Solapur Tarun Bharat Digital Media

March 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0766086

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697