———————————————————-
भोकर(प्रतिनिधी)नांदेड जिल्ह्याचे ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांचा वाढदिवस दि.७ जुलै २०२४ रोजी भोकर शहरातील गणराज रिसॉर्ट येथे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी कुलदैवत भगवान श्रीकृष्ण यांचे पूजन व तदनंतर छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर केक कापून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ओबीसी चळवळीतील रामेश्वर गौड महाराज बारडकर एस.जी. माचनवार, नंदकुमार कोसबतवार,जेष्ठ पत्रकार एल.ए.हिरे, प्रगतशील शेतकरी मारोती वागदकर आदींची उपस्थिती होती.
या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांचा फाईल फोल्डर भेटवस्तू देऊन यथोचित्त सन्मान करण्यात आला तसेच भोकर तालुक्यातील गरजू, अल्प-भूधारक प्रत्येक गावातील १० शेतकऱ्यांना एकूण ७०० चार्जिंग बॅटरीचे वाटप करण्यात आले.त्यानंतर नांदेड भोकर रोडच्या दुतर्फा वटवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संबंध नांदेड जिल्ह्यातील त्यांचे हितचिंतक,मित्रपरिवार व विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येऊन त्यांना उदंड आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमास भोकर तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधवराव अमृतवाड,
कृषी उत्पन्न बाजार समिती चे उपसभापती बालाजी शानमवाड, संचालक उज्वल केसराळे, रामचंद्र मुसळे, सतीश देशमुख, कृष्णा वागतकर, मारोती अंगरवार, मोहन राठोड, शिवसेना उ.बा.टा.गटाचे तालुकाप्रमुख संतोष आल्लेवार, माजी उपसभापती सुरेश बिल्लेवाड, प्रहार तालुकाध्यक्ष अॅड.शेखर कुंटे, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष ॲड. शिवाजी कदम, किसान एकता संघाचे मराठवाडा अध्यक्ष प्रतापराव कल्याणकर,माजी उपनगराध्यक्ष मुदखेड संजय आऊलवार,मारोती बल्लाळकर आदींसह तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, चेअरमन,ग्रा.पं.सदस्य व शेतकरी बांधव यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांनी राबवित असलेल्या विविध सामाजिक उपक्रमाचे कौतुक करून पत्रकार संघातर्फे त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ओबीसी नेते नामदेवराव आयलवाड यांनी मित्रमंडळातर्फे वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने त्यांना मनापासून धन्यवाद दिले व तालुक्यातून आलेले सर्व पत्रकार बांधव,शेतकरी वर्ग व विविध संघटनाचे पदाधिकारी,हितचिंतक, यांचे मनापासून आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन अंबादास आटपलवाड गुरुजी यांनी केले आभार तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष माधवराव अमृतवाड यांनी मानले.