सोलापूर, 29 जुलै (हिं.स.)। तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून शासनाने आळंदी, पंढरपूरसाठी 250 कोटीचा निधी मंजूर केला असून संत चोखोबा स्मारकासाठी 25 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आली असून आवश्यकता भासल्यास आणखीन जास्तीचा निधी उपलब्ध करण्यासाठी आपले सरकार असल्यामुळे तो निधी उपलब्ध करू, असा विश्वास आ. समाधान आवताडे यांनी दिला.
धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे यांच्या पुढाराकारातून स्व. लक्ष्मीबाई काळुंगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्मरणार्थ ह भ प बोधले महाराज यांचे श्री संत चोकोबाराय चरित्र आणि तत्त्वज्ञान या विषयावर पाच दिवसीय प्रवचनमाला आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
यावेळी बोलताना आ. अवताडे म्हणाले की, मंगळवेढे भूमी संतांची आणि पंढरपूर भूमी देवाची असल्यामुळे संताच्या आणि देवाच्या भूमीत आपणाला वास्तव करण्याची भाग्य मिळाले. मात्र, याच भूमीतील संत आणि देव यांची जोपासना करण्याची जबाबदारी देखील आपली आहे. माझ्या प्रयत्नाने महालिंगराया देवस्थानसाठी सात कोटी रुपये तरतूद केली. माचणूरच्या सिद्धेश्वर देवस्थानसाठी 30 कोटीचा निधी प्रास्तावित केला आहे.