दोदडगाव रामगव्हाण वस्ती येथील विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरू
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
वडीगोद्री31 जुलैअंबड बस आगारा तर्फे दोदडगाव व रामगव्हाण वस्ती येथील विद्यार्थ्यांना श्री गुरूदेव विद्या मंदिर वडीगोदरी येथील शाळेत येण्यासाठी व घरी परत जाण्यासाठी मानव विकास अंतर्गत बस दि.३१ जुलै रोजी सुरु करण्यात आली.यावेळी दोदडगाव व रामगव्हाण वस्ती येथील विद्यार्थ्यांनी व पालकांनी समाधान व्यक्त केले.ही बस सुरू होण्यासाठी शाळेचे प्राचार्य मुंढे सर व बोरकर सर यांनी वेळोवेळी अंबड आगाराशी पत्रव्यवहार करून विशेष प्रयत्न केले.
दोदडगाव व रामगव्हाण वस्ती येथील जवळपास ५ वी ते १२ वी पर्यंत चे ५० त ६० मुले मुली वडीगोदरी येथील गुरूदेव विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेण्यासाठी येतात परंतु त्यांना शाळेत येण्यासाठी नाविलाजास्तव खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागत होता. खाजगी वाहनामध्ये मुले दाटीवाटीने करून बसत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण होत होती ही बस सकाळी ९.३० ला मुलांना शाळेत घेऊन येणार आहे व ४ वाजुन ५ मिनीटांनी मुलांना घेऊन जाणार आहे .
यावेळी प्राचार्य मुंढे सर यांनी अंबड आ गार प्रमुखाचे आभार मानले. बस वडीगोदरी येथे आल्यानंतर शाळेच्या वतीने बस चे चालक घुगे यांचा मुंढे सर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तसेच वाहक बोर्डे याचा सत्कार जी.आर.गावडे सर यांनी केला. यावेळी वडीगोदरीमधील पालक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.