पिलीव – माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील विठ्ठल _ दयाजी याञेस मंगळवारपासुन प्रारंभ होत आहे. मंगळवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी आरेवाडी येथुन ज्योत आणुन तसेच आरत्यांच्या कार्यक्रमाने याञेस सुरुवात होते तर बुधवार दिनांक 25 नोव्हेंबर रोजी गजी ढोल कार्यक्रमाचे आयोजन तसेच देवास महाप्रसाद म्हणजेच अजान बळी देण्याची अनेक वर्षांपासूनची प्रथा आहे. या याञेनिमित्त रक्तदान शिबिराचे तसेच क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात येते .सुळेवाडी या गावातील अनेक कुटुंब तसेच कुटुंबातील व्यक्ती मोठ्या प्रमाणात वसई येथे वेगवेगळ्या कामानिमित्त तसेच नोकरीनिमित्त बाहेरगावी असतात माञ या याञेनिमित्त सर्व गावाकडे येतात व याञेचा आनंद लुटतात गेल्या अनेक वर्षांपासूनची या याञेची पारंपरिक व सांस्कृतिक परंपरा चालत आली आहे.ही याञा विठ्ठल _ दयाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करुन अतिशय शांततेत व भक्तीमय वातावरणात पार पाडली जाते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...























