सुपरफास्ट गाड्यांना परतूर रेल्वे स्थानकावर थांबा मंजूरी साठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शिफारस
डॉ स्वप्नील मंत्री यांच्या निवेदनाची दखल घेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र
परतूर: प्रतिनिधी
बऱ्याच दिवसांनी प्रलंबीत सचखंड आणि मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस आणि इतर सुपरफास्ट गाड्यांना परतूर रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यासाठी डॉ. स्वप्नील मंत्री यांच्या निवेदनाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले.
डॉ स्वप्नील मंत्री मूख्य प्रदेश प्रवक्ते तथा मुख्य प्रदेश समन्वयक भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना परतूर रेल्वे स्थानकावर सचखंड आणि मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस आणि इतर सुपरफास्ट गाड्यांना परतूर रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी निवेदन सादर केले होते.
त्याची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहून बऱ्याच दिवसांनी प्रलंबीत थांब्याची मागणी पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला असुन पत्रात जांब समर्थ क्षेत्र येथे जाण्यासाठी परतूर रेल्वे स्थानक जवळचे स्थानक असून दरवर्षी रामनवमी व विविध उत्सवानिमित्त 3 लाखांहून जास्त भाविक देशातील विविध भागातून जांब समर्थ येथे येतात व त्यांच्या सोयीसाठी परतूर जवळचे रेल्वे स्थानक आहे. ह्या व अन्य बाबी लक्षात घेता परतूर रेल्वे स्टेशनवर सचखंड, मराठवाडा संपर्क क्रांती, नरसापुर व अन्य सर्व सुपरफास्ट एक्स्प्रेस रेल्वे गाड्यांना परतूर येथे थांबा अशी मागणी केली आहे.
ह्याबद्दल डॉ. स्वप्नील बी. मंत्री, डॉ. सुधीर आंबेकर, डॉ. हरिप्रसाद ढेरे, डॉ उद्धव चव्हाण, प्रसाद बापटे, विठू कुलकर्णी, अजित पोरवाल, सखाराम कुलकर्णी, सावता काळे, सचिन काटे, दुर्गेश पोतदार, आनंद बगडीया, योगेश खंडेलवाल, प्रवीण कावले, निहित सकलेचा, अमित मोर, अनिल अग्रवाल, प्रशांत डोम, अभिजीत जोशी, आनंद कोटेचा, डॉ खोसे, कल्पेश भंडारी, शुभम ठाकुर, सौरभ बगडीया, डॉ टेंभरे, पवन अग्रवाल व परतूर सर्वांगिण विकास समितीच्या सर्व सदस्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.