Thursday, September 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नांदगाव मतदारसंघात राडा, सुहास कांदेंकडून समीर भुजबळांना धमकी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
November 20, 2024
in solapur
0
नांदगाव मतदारसंघात राडा, सुहास कांदेंकडून समीर भुजबळांना धमकी
0
SHARES
63
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मनमाड, 20 नोव्हेंबर (हिं.स.)।

: नांदगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्या गटात राडा झाला. सुहास कांदे यांची मतदारांना घेऊन चाललेली बस समीर भुजबळांनी गाड्या आडव्या लावत अडवली. यानंतर सुहास कांदे तिथे आले असता त्यांनी थेट समीर भुजबळांना मारून टाकण्याची धमकी दिली. आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे सुहास कांदे समीर भुजबळांना संतापून म्हणाले. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर मोठा राडा झाला.

नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. कुठल्याही परिस्थितीत मतदार जावू देणार नाही, असा पवित्रा भुजबळांनी घेतला होता. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे दोघेही आमनेसामने आले. आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे म्हणत सुहास कांदेंनी समीर भुजबळांना थेट मारून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळाने समीर भुजबळांनी अडवून ठेवलेले मतदार संतापल्याचे पाहायला मिळाले. आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला मतदानापासून वंचित ठेवू नका, पोलिसांनो…आमचे आधारकार्ड तपासा, आम्ही बिहारी नाही तर मतदार संघातलेच आहोत, जेवणासाठी केवळ थांबलेलो होतो, संयम बाळगला, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”, असे म्हणत मतदारांनी संताप व्यक्त केला. यावर छगन भुजबळ म्हणाले की, कांदे यांच्या संबंधित व्यक्तीच्या शाळेत हजार लोक आणून ठेवले होते. सचिन मानकर हिस्ट्री शुटर तिथे पिस्तूल घेऊन आला. तुला मारून टाकेल, असे समीरला बोलला. पोलिसांनी त्याला गाडीत बसवले आणि नंतर सोडून दिले. पोलीस असे वागत असतील तर कसे चालेल? मी एसपींना सांगितले आहे की, तुम्ही असे कराल तर तिथे खून पडतील. याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची असेल, अशा रीतीने दादागिरी चालू असेल तर आम्हीही तयार आहोत, असा इशारा देखील छगन भुजबळ यांनी दिला.

यावर सुहास कांदे म्हणाले की, काही ऊसतोड कामगार राज्यभर कामासाठी साखर कारखान्यावर कामाला जातात. ते मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आले होते. त्यांच्या मुकादमाने त्यांच्य्साठी एकत्रित जेवणाची व्यवस्था केली होती. समीर भुजबळ व त्यांच्या गुंडांनी त्यांना मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली. त्या मतदारांच्या गाड्याही अडवल्या आणि फोडल्या. याबाबत माहिती मिळताच मी त्या ठिकाणी पोहचलो. त्यावेळी समीर भुजबळांनी त्यांची गाडी आडवी घालून त्यांना त्यांना मतदानापासून रोखले जात होते म्हणून मी त्यांच्या मदतीला धावून गेलो. हे मतदार नसतील तर त्यांना अटक करा, असे मी आयोगाला सांगितले. यानंतर निवडणूक आयोगाने शहानिशा केली आणि मतदारांना सोडून दिले.

मी नाव घेऊन धमकी दिली नव्हती

सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याबाबत विचारले असता सुहास कांदे म्हणाले की, समीर भाऊंचे नाव घेऊन मी धमकी दिली नाही, तिथे आमच्या एका माणसाला मारत होते, मी त्यांना म्हटले की त्याचा मर्डर होईल. एका मुकादमाकडे शंभर, दीडशे लोक काम करतात. नांदगाव तालुक्यातील सर्व मुकादमांनी मिळून एका ठिकाणी जेवण ठेवले होते, म्हणून ते लोक आले होते. नांदगाव विधानसभा मतदारसंघ मागासलेला आहे. ते मतदार ऊस तोडीला गेले होते, त्यांना वाटलं आपलं कर्तव्य निभवावं, म्हणून ते आले होतो.

Post Views: 46
Previous Post

अमरावती जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंतसरासरी ४५. १३ टक्के मतदान

Next Post

भोकरदन कुंभारी येथील बुथवर दिव्यांग कर्मचारी यांनी चालविले स्वतंत्र्य मतदान केंद्र

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भोकरदन कुंभारी येथील बुथवर दिव्यांग कर्मचारी यांनी चालविले स्वतंत्र्य मतदान केंद्र

भोकरदन कुंभारी येथील बुथवर दिव्यांग कर्मचारी यांनी चालविले स्वतंत्र्य मतदान केंद्र

ताज्या बातम्या

सोलापुरात काँग्रेसनेत्याच्या नातवाने दिल्या मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा #viral #solapurnews #news

September 17, 2026

आंबेडकरांवरील वाक्य भोवले अखेर आमदार रमेश कदम यांच्यावर गुन्हा दाखल #viral #solapurnews #news

September 17, 2026

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात मंगळवारी पूजा

September 16, 2026
श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

श्री चन्नय्या स्वामी मठात गुरुवार श्रावणमास समाप्ती

September 16, 2026
जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

जमीयातुल हनफिया व रिजविया मदरसा येथे ईद मिलाद निमित्त विविध कार्यक्रम

September 16, 2026
मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

मुढवीत वाळू माफियांचा हैदोस! शेतकऱ्याची ४ जनावरे टिपरखाली चिरडली

September 16, 2026
गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

गणेशोत्सवानिमित्त वीरशैव विद्या संवर्धिनी मंडळाच्या व्याख्यानमालेतून वैचारिक मेजवानी

September 16, 2026
सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

सोलापूर विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत ‘नेटबॉल’ खेळाचा समावेश करा

September 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1222624

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!