तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदराची भावना दृढ करणे, स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानांची आठवण करून देणे व देशभक्तीची प्रेरणा जागविण्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्र शासनाच्या उपक्रमाला प्रतिसाद देत सोलापूर महानगरपालिकेतर्फे “हर घर तिरंगा अभियान 2025” राबविण्यात येत आहे.
या अनुषंगाने, नागरिकांना राष्ट्रध्वजाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि देशभक्तीचा संदेश सर्वत्र पोहोचवण्यासाठी शहरातील सात प्रमुख ठिकाणी तिरंगा प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हुतात्मा स्मृती मंदिर , छत्रपती संभाजी महाराज चौक , मेकॅनिक चौक , होम मैदान , रंगभवन प्लाझा , म.न.पा. कॅम्प शाळा , जुळे सोलापूर डी मार्ट याठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.या प्रदर्शनांमध्ये विविध आकारांचे आणि स्वरूपांचे तिरंगा, स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्वाच्या घटना व व्यक्तिमत्वांचे माहितीपट तसेच विद्यार्थ्यांनी व स्थानिक कलाकारांनी तयार केलेली देशभक्तीपर चित्रकला व हस्तकला यांचा समावेश आहे.
“हर घर तिरंगा” अभियानात सहभागी होऊन घरा घरावर तिरंगा फडकवावा आणि या प्रदर्शनांना भेट देऊन देशभक्तीचा उत्साह वाढवावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
Post Views: 11