Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भेसळयुक्त मिठाई – लोकांच्या जीवाशी खेळ !  

तरुण भारतbyतरुण भारत
October 13, 2025
in mumbai
0
0
SHARES
28
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

                     नोएडातील सेक्टर ११५ मधील एका मिठाई बनवणाऱ्या युनिटवर दिल्लीच्या अन्न सुरक्षा विभागाने हल्लीच छापा टाकून ११०० किलो भेसळयुक्त मिठाई जप्त करून ती जागेवरच नष्ट केली. याच विभागाने जीबी नगर परिसरात आणखी एका ठिकाणी छापा टाकून १८० किलो भेसळयुक्त मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थ जप्त केले. जयपूरच्या अन्न सुरक्षा विभागानेही अशाच एका कारवाईत ३५० किलो भेसळयुक्त मिठाई. ६५० किलो बनावट मिल्क केक आणि ५०० लिटर नकली दूध जप्त करून ते नष्ट केले. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागपूर विभागातील अन्न आणि औषध प्रशासनाने “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा” मोहिमेच्या अंतर्गत ३६ लाख रुपयांचा तब्बल ३० हजार किलो निकृष्ट आणि भेसळयुक्त अन्नसाठा जप्त केला. दूध, मिठाई, तूप, पनीर, फरसाण यांसारख्या पदार्थांचे नमुने तपासले असता अनेक ठिकाणी भेसळ आढळली. दिवाळी जवळ आली कि मिठाईत भेसळ करून ती चढ्या दारात विकणाऱ्यांचे सर्वत्र पेव फुटते. या काळात सर्वत्र गोडधोडाचे वातावरण असल्याने घसा खवखवणे, खोकला सुरु होणे यांसारखे त्रास जाणवू लागले तरी ते मिठाईमुळे होत आहेत कि घरात बनवलेल्या तेलकट फराळामुळे ते कळत नाही. या दिवसांत प्रशासनाचा अन्न आणि औषध विभाग अलर्ट मोडवर असतो. कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवण्याच्या लोभाने ही भेसळयुक्त मिठाई बनवली जाते. भेसळयुक्त पेढे किंवा मिठाई खाल्यास घशात खवखव होते, खोकला येतो आणि पोटात दुखते. चक्कर येणे, पोटात मळमळणे , उलटी, जुलाब सुरु होणे यांसारखे परिणाम जाणवू लागतात. काविळसारख्या आजाराची लागण होऊ शकते.  किडनी आणि यकृतावरही भेसळयुक्त मिठाईचा गंभीर परिणाम होऊ शकतो. इतकेच नाही, तर विषबाधा अधिक झाल्यास खाणाऱ्याचा मृत्यूही ओढावू शकतो. भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्यास क्षयरोग होऊ शकतो. कृत्रिम दुधात युरियाची भेसळ असल्यास युरियातील नायट्रोजनमुळे मूत्रपिंड, यकृत आणि हृदय निकामी होऊ शकते. मावा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे दूध केमिकलयुक्त असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीत निष्पन्न झाल्यास भारतीय दंड विधान ३२८ कलमान्वये अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येतो. मिठाईसाठी वापरण्यात आलेल्या दुधात पाणी आणि दुधाची पावडर मिश्र केल्याचे आढळल्यास २६२ कलमान्वये गुन्हेगारास आर्थिक दंड ठोठावण्यात येतो. असे असूनही प्रतिवर्षी मिठाईत केल्या जाणाऱ्या भेसळीचे प्रमाण कमी न होता दरवर्षी त्यांमध्ये वाढच होत आहे. गणेशोत्सव आणि दिवाळीच्या काळात अनेक ठिकाणी भेसळयुक्त मिठाई सर्रासपणे विकली जाते. आर्थिक लाभासाठी पामतेलाचा वापर करून खवा बनवणे. कृत्रिम आणि केमिकलयुक्त दूध तयार करून त्यापासून मिठाई बनवणे यासारखे प्रकार सणासुदीच्या काळात प्रकर्षाने घडतात. स्वतःच्या स्वार्थासाठी लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा महाभागांना खरेतर कठोर शिक्षा होणे अपेक्षित आहे; मात्र अनेकदा ही मंडळी कायद्यातील पळवाटांचा लाभ घेऊन निर्दोष सुटतात किंवा जामिनावर बाहेर पडतात. यांमध्ये कायद्याचे भय न राहिल्याने दरवर्षी भेसळयुक्त मिठाई बनवून विकणाऱ्यांमध्ये वाढच होताना दिसत आहे. यांच्यावर कायमस्वरूपी वचक बसण्यासाठी कठोर कायद्यासह जनमानसांत जागृती होणे नितांत गरजेचे आहे. लोकांच्या जीवाचे सोयरसुतक नसणाऱ्यांना खरेतर आता जनतेनेच धडा शिकवायला हवा !
सौ. मोक्षदा घाणेकर, काळाचौकी, मुंबई 

Post Views: 67
Previous Post

स्वाभिमानीची २४ वी ऊस परिषद जयसिंगपूरला

Next Post

यावर्षी दिवाळी ४ दिवस, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

यावर्षी दिवाळी ४ दिवस, 21 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन

ताज्या बातम्या

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

बार्शीतील दोघांवर ‘एमपीडीए’ अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई

September 19, 2026
श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते पूजा

September 19, 2026
 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

 बार्शीतील चाटे समूहाचे  प्रा. पांडुरंग घाटगे यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार

September 19, 2026

बार्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा; शेतकऱ्यांना तातडीची मदत व कर्जमाफी द्या, शिवसेनेची मागणी

September 19, 2026

गौरी गणपती आरासमध्ये लावले पोलीसांच्या कार्याचे संदेश देणारे फलक

September 19, 2026
जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिल्हास्तरीय वेटलिफ्टिग स्पर्धेत तीन खेळाडू प्रथम; पुणे विभागीय स्पर्धेसाठी निवड

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1235970

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!