Saturday, May 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कामगार सुधारणा, युवा सक्षमीकरण आणि क्रीडा प्रोत्साहन प्रयत्नांचे उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी केले कौतुक

तरुण भारतbyतरुण भारत
October 15, 2025
in india
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्‍ली – केंद्रीय कामगार आणि रोजगार आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय, कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे आणि युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांच्यासह मंत्रालयांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज संसद भवनात उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली.

या भेटीदरम्यान, उपराष्ट्रपतींना कामगार आणि रोजगार मंत्रालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने हाती घेतलेल्या प्रमुख उपक्रमांची आणि धोरणात्मक सुधारणांची माहिती देण्यात आली.

कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या कामगारांसाठी चांगल्या कामाच्या परिस्थिती सुनिश्चित करणे, कामगारांचे जीवनमान सुधारणे, रोजगारक्षमता वाढवणे, सामाजिक सुरक्षा मजबूत करणे, व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्याला प्रोत्साहन देणे आणि सुसंवादी औद्योगिक संबंधांना चालना देणे,  यासारख्या व्यापक उपक्रमांची माहिती उपराष्ट्रपतींना देण्यात आली. मंत्रालयाने ई-श्रम पोर्टल, श्रम सुविधा पोर्टल, प्रधानमंत्री विकसित  भारत रोजगार योजना आणि राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टल यासारख्या प्रमुख सुधारणा उपक्रमांवरही प्रकाश टाकला.

कामगार कायदे सुलभ करण्याच्या मंत्रालयाच्या प्रयत्नांबद्दल आणि विविध क्षेत्रांमध्ये सामाजिक सुरक्षा वाढविण्यासाठी आणि नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सुरू असलेल्या कामाबद्दल उपराष्ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. कामगारांचे कल्याण उंचावण्यासाठी  आणि समावेशक आर्थिक विकासाकडे भारताचा प्रवास पुढे नेण्यासाठी मंत्रालयाच्या वचनबद्धतेचे त्यांनी कौतुक केले.

युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या प्रमुख उपक्रमांचीही उपराष्ट्रपतींना माहिती देण्यात आली. मंत्रालयाचे प्रयत्न, तरुणांमधील क्षमता आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर, त्यांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी करून घेण्यावर आणि “जन भागिदारी से जन आंदोलन” या कल्पनेला मूर्त स्वरूप देणाऱ्या सहभागी कार्यक्रमांद्वारे सामुदायिक सेवेच्या भावनेला प्रोत्साहन देण्यावर केंद्रित आहेत, असे यावेळी उपराष्‍ट्रपतींना सांगण्‍यात आले.

उपराष्ट्रपतींना राष्ट्रीय युवा धोरण, ‘मेरा युवा भारत’ (माय  भारत), राष्ट्रीय सेवा योजना, युवा वसतिगृहे आणि राष्ट्रीय युवा पुरस्कार यासारख्या प्रमुख युवा-केंद्रित कार्यक्रमांची माहिती देण्यात आली.

उपराष्ट्रपतींना खेलो इंडिया, ‘टार्गेट ऑलिंपिक पोडियम’ योजना (टॉप्स), राष्ट्रीय क्रीडा महासंघांना सहाय्य, खेलो भारत नीती  आणि ‘वन कॉर्पोरेट वन स्पोर्ट’ – सीएसआर मॉडेल यासह मंत्रालयाच्या क्रीडा विकास उपक्रमांची माहिती देण्यात आली. त्यांनी ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकसह आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूंच्या – विशेषतः महिला खेळाडूंच्या – उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक केले आणि देशात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्राच्या वाढत्या सहभागाचे कौतुक केले.

ऑलिंपिकसह प्रमुख आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा भारतात आयोजित करण्याच्या मंत्रालयाच्या प्रयत्नांचे कौतुक करताना, उपराष्ट्रपतींनी सांगितले की, अशा उपक्रमांमुळे क्रीडा विकासाला लक्षणीय चालना मिळेल आणि जागतिक स्तरावरील उदयोन्मुख क्रीडा राष्ट्र म्हणून भारताचे स्थान मजबूत होईल.

Post Views: 31
Previous Post

गुगल एआय हब भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी आमूलाग्र बदल घडवणारे ठरेल – केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव

Next Post

अतिवृष्टी पावसाने झालेल्या खरीप पिकांचे प्रती हेक्टर ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अतिवृष्टी पावसाने झालेल्या खरीप पिकांचे प्रती हेक्टर ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्या

ताज्या बातम्या

महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

महाराष्ट्र दिनी एनसीएमसी कार्ड शिबिर

May 2, 2026
महावितरणात ७६ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगार पुरस्काराने सन्मान

महावितरणात ७६ तांत्रिक कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामगार पुरस्काराने सन्मान

May 2, 2026
खिडकीच्या तावदानामध्ये अडकलेल्या भारद्वाज पक्ष्याची सुटका

खिडकीच्या तावदानामध्ये अडकलेल्या भारद्वाज पक्ष्याची सुटका

May 2, 2026
अभिसिद्ध पेरेंट्स लीगचे दिमाखात उद्घाटन; संजीवनी स्ट्रायकर्स, टाईम सीसी, सलगर वॉरियर्स आणि रायझिंग स्टार विजयी

अभिसिद्ध पेरेंट्स लीगचे दिमाखात उद्घाटन; संजीवनी स्ट्रायकर्स, टाईम सीसी, सलगर वॉरियर्स आणि रायझिंग स्टार विजयी

May 2, 2026
बौध्द पोर्णिमे निमित्त भगवान बुद्धांना अभिवादन

बौध्द पोर्णिमे निमित्त भगवान बुद्धांना अभिवादन

May 2, 2026

महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट

May 1, 2026

मनपात कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा

May 1, 2026

१ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एनसीएमसी कार्ड शिबिर कामगार व शिक्षकांचा गौरव

May 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0841301

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697