सातारा – राजवाडा परिसरातील श्री पंचपाळी हौददुर्गा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षीचा दीपावली उत्सव शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबर पासून प्रारंभ होत आहे .पहिल्याच दिवशी वसुबारसेला अर्थात गोवत्स पूजन करण्यासाठी महिलांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे राजवाडा परिसरातील मंदिराच्या प्रांगणात भव्य मंडपामध्ये 11 गाय आणि वासरांचे पूजन करण्यासाठी संधी उपलब्ध केली आहे. दरवर्षी ही गाय वासरू पूजा करण्यासाठी सातारा शहरातून हजारो महिला मोठ्या संख्येने दिवसभर उपस्थित असतात. या वर्षी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत हे गोवत्स पूजन करता येणार आहे अशी माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी दिली.
तसेच यावर्षी दुर्गा माता मंदिरात दररोज सकाळी सहा वाजता दिनांक 6 नोव्हेंबर पर्यंत सकाळी काकड आरती केली जात असून या काकड आरतीला सातारकर भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही केले आहे.



















