Thursday, June 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

साडेसात फूटी अजगराचे यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन; नैसर्गिक अधिवासात मुक्त

तरुण भारतbyतरुण भारत
October 25, 2025
in solapur
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेड परिसरात दिनांक 19 ऑक्टोबर रोजी तब्बल 7.5 फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कंपनीतील सुरक्षा अधिकारी श्री. विद्वान गजधाने यांना हा अजगर सर्वप्रथम दिसला. त्यांनी तात्काळ स्थानिक सर्पमित्र नागेश बिराजदार यांना या घटनेची माहिती दिली. स्थानिक सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहोचून या सापास ताब्यात घेतले. अजगर हा साप प्रथमच त्यांना आढळून आल्याने त्यांनी याची माहिती सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांना दिली. माहिती मिळताच राहुल शिंदे व नाग फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल अलदार व टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सापाची अधिक पाहणी केल्यावर हा साप सुदृढ असल्याचे निश्चित झाले. यावेळी स्थानिक सर्पमित्र राजकुमार बिराजदार, अमोल बिराजदार, मल्लिकार्जुन हीरोळे आणि नागेश बिराजदार यांनी या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोलाची मदत केली. सोलापूर जिल्ह्यात अतिशय दुर्मिळ असणारा हा साप असून हा वन्यजीव अधिनियम 1972 च्या कायद्याअंतर्गत अनुसूची 1(शेड्युल 1) मध्ये समाविष्ट असल्याने याला एखाद्या वाघा ईतकेच संरक्षण प्राप्त होते. यामुळे या घटनेची माहिती सहाय्यक उपवनसंरक्षक अजित शिंदे, वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण गांगुर्डे आणि वनरक्षक श्रीशैल पाटील यांना कळविण्यात आली व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे रेस्क्यू ऑपरेशन अत्यंत सुरक्षितपणे पार पडले. सर्पमित्रांनी अतिशय काळजीपूर्वक या अजगराला पकडले आणि त्याला तात्काळ त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. यावेळी गोकुळ शुगर्सचे रावसाहेब गदादे, अरविंद जंगाले व कर्मचारी तसेच वनसेवक बसवराज हिरोळे आणि सोलापूरचे सर्पमित्र संतोष धाकपाडे व शिवानंद हिरेमठ हेही उपस्थित होते.

 अजगर हा साधारणपणे जंगले, खडकाळ प्रदेश, नदीकाठचे घनदाट झुडपे किंवा शेताजवळील उसाच्या लागवडीमध्ये उष्णता आणि लपण्यासाठी जागा शोधत असतो. सोलापुरात मागच्या महिन्यात आलेल्या पुरामुळे अजगरांसारख्या प्राण्यांचे स्थलांतर झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय सोलापुरात अजगर आढळल्याची नोंद बोटावर मोजण्याइतकी असली तरी धोत्री आणि करजगी या भागाचा अभ्यास केल्यास, भीमा नदीचा परिसर आणि तेथील नैसर्गिक वनांमुळे या सापांना अनुकूल अधिवास (Habitat) मिळतो. वनविभागाने या घटनेची तत्परता दाखवत आमच्या टीमला तात्काळ सहकार्य केल्याने हा अजगर मानवी हद्दीतून त्वरित त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यास जलदगती मिळाली. 

सर्प अभ्यासक राहुल शिंदे, सोलापूर

हा साडेसात फुटी अजगर खूपच मोठा आणि सशक्त होता. गोकुळ शुगर इंडस्ट्रीज पासून धोत्री गाव 2 किलोमीटरवर असून मानवी वस्तीजवळ तो आल्याने त्याला तात्काळ रेस्क्यू करणे आवश्यक होते. अशा मोठ्या सापाला पकडताना त्याच्या सुरक्षिततेला आणि पकडणाऱ्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला महत्त्व देणे गरजेचे असते. आमच्या टीमने या अजगरास अत्यंत शांतपणे आणि शास्त्रीय पद्धतीने रेस्क्यू करून तेथील उपस्थिनांमध्ये सापांबद्दल जनजागृती करण्यात आली. सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल.

अनिल अलदार, अध्यक्ष, नाग फाउंडेशन

अजगर हा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972 च्या शेड्यूल I (अनुसूची १) मध्ये समाविष्ट असलेला अत्यंत महत्त्वाचा आणि संरक्षित प्राणी आहे. या कायद्यामुळे अजगराला मारणे, पकडणे किंवा त्याचा छळ करणे हा गंभीर गुन्हा आहे. पर्यावरणातील उंदिर, घुस आणि लहान सस्तन प्राण्यांवर नियंत्रण ठेवणारा हा प्राणी अन्नसाखळीतील एक महत्त्वाचा घटक आहे. गोकुळ शुगर इंडस्ट्रीज व्यवस्थापन, रावसाहेब गदादे व अरविंद जंगाले, वनसेवक बसवराज हिरोळे तसेच सर्प अभ्यासक राहुल शिंदे आणि नाग फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल अलदार यांच्या संपूर्ण टीमने रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी पार पाडले याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो.

*श्रीशैल पाटील वनरक्षक, सोलापूर.*

Post Views: 32
Previous Post

डॉ. शिवाजी शिंदे यांच्या ‘ भावगंधित व्यक्तिमत्वे ‘ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात

Next Post

अखेर क्रीडा उपसंचालकाकडून विजयी कबड्डी संघ बाद,  बोगस खेळाडू प्रकरणात कारवाई 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अखेर क्रीडा उपसंचालकाकडून विजयी कबड्डी संघ बाद,  बोगस खेळाडू प्रकरणात कारवाई 

ताज्या बातम्या

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

जीवनाचे सार्थक करायचे असेल तर शिव आराधनेचा अंगीकार करा  : भालचंद्र महाराज 

June 10, 2026
राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

राज्यात सोलापूरची रेकॉर्डब्रेक कामगिरी ; ५ दिवसांत २० हजार कार्डची नोंदणी !

June 10, 2026

सीईटी-पीसीबी परीक्षेत वालचंद कनिष्ठ महाविद्यालयाचे घवघवीत यश

June 10, 2026

सर्व महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी बायोमेट्रिक बंधनकारक!

June 10, 2026
नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

नेत्र आरोग्य व नेत्रदान जनजागृतीसाठी सोजर फार्मसीचे विशेष शिबीर यशस्वी 

June 10, 2026

स्मार्ट सिटीत कचरा उचलण्याबाबत दुर्लक्ष 

June 10, 2026

मनपा क्षयरोग अधिकारी डॉ. हराळकर यांच्यावर कारवाईची मागणी

June 10, 2026
एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

एन बी नवले सिंहगडच्या विद्यार्थ्यांची आयटी क्षेत्रात दमदार झेप

June 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0902983

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697