हिंगोली – वसमत शहराचे अभिमान असलेले जिल्हा परिषद मैदान अक्षरशः उद्ध्वस्त अवस्थ झाले आहे. दसरा नुमायश आणि दिवाळीच्या फटाक्यांच्या दुकानांसाठी मैदानाचा वापर करण्यात येत, पण नुमायश संपल्यानंतर या मैदानाची झालेली दुर्दशा बघून खेळाडू, आणि क्रीडाप्रेमी संतापून उठले आहेत!
संपूर्ण मैदानावर मोठमोठे खड्डे, उखडलेली माती, प्लास्टिक व कचऱ्याचे ढिगारे, झाल्याचे चित्र!
दररोज सकाळी वॉकिंगसाठी येणारे ज्येष्ठ नागरिक, तरुण खेळाडू आणि लहान मुले यांना आता मैदानावर पाऊल ठेवणेही कठीण झाले आहे.
खेळाडूंनी स्पष्ट शब्दांत संताप व्यक्त केला आहे की,
“दसरा कमिटी लाखो रुपयांचा भाडे कमावते. दुकाने, पाळणे, सर्कस, हॉटेल, विक्रेते यांच्याकडून भरमसाट भाडा घेतला जातो. पण मैदान उद्ध्वस्त झाल्यावर दुरुस्तीला एक रुपया खर्च करण्याची त्यांची तयारी नसते! मैदानाकडे पहात सुद्धा नाही.
हे मैदान लोकांचं आहे, त्यांच्या कमाईचं साधन नाही!” असे स्थानिक खेळाडूंनी आणि क्रीडाप्रेमींनी दसरा कमिटीच्या या बेजबाबदार वागणुकीचा तीव्र निषेध केला आहे.
प्रशासनाकडेही आरोप केला जात आहे की त्यांनी मैदानाच्या हानीकडे डोळेझाक केली आहे.
स्थानिक खेळाडूंनी स्पष्ट शब्दांत सांगितले
“दसरा कमिटी आणि प्रशासन या दोघे दरवर्षी मैदानाचे नुकसान करत आहे. त्याचवेळी खेळाडूंनी प्रशासन आणि दसरा कमिटीला इशारा दिला आहे.
“आता पुढे ! मैदानाचे नुकसान सहन करणार नाही. पुढील वर्षी जर पुन्हा नुमायशसाठी हे मैदान दिले गेले, तर तीव्र आंदोलन उभारले जाईल!”
याच पार्श्वभूमीवर खेळाडूंनी इंजी. सय्यद इम्रान अली यांच्याशी संपर्क साधला, ते स्वतः मैदानावर हजर राहून मैदानाची बिकट अवस्था पाहिली आणि खेळाडूंची व्यथा ऐकली. इंजी. इम्रान अली यांनी पुढाकार घेत शहरातील खेळाडू आणि नागरिकांना त्रास होऊ देणार नाही. मी स्वतःच्या खर्चाने संपूर्ण मैदान स्वच्छ करून देईन आणि त्याची पूर्वस्थिती आणण्यासाठी प्रयत्न करीन.” शहरातील नागरिकांनी आणि खेळाडूंनी त्यांच्या या पुढाकाराचे मनःपूर्वक स्वागत करून आभार मानले.

















