सोलापूर – दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र श्री विठुरायाच्या पंढरपूरात भाविकांचा मेळा जमला असताना, सावत्र उत्साहाचे आनंदाचे आनंद धार्मिकतेचे वातावरण दिसून येत आहे. आषाढीनंतर येणारी कार्तिकी अर्थात प्रबोधिनी एकादशी दुसरी महत्त्वाची एकादशी यात्रा आहे. सोलापूर शहर जिल्ह्यात या एकादशीचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. याच कार्तिक एकादशी निमित्त सोलापूर शहरातील विविध विठ्ठल मंदिरात देखील भाविकांची सकाळपासूनच श्रींच्या दर्शनासाठी मांदियाळी होती. शहरातील चौपाड तसेच जुन्या विठ्ठल मंदिरात आबालवृद्ध भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले.
दरम्यान, शहरातील चौपाड आणि जुने विठ्ठल मंदिरात पहाटेपासून भक्तीमय वातावरण होते. पहाटे पाच वाजता धार्मिक विधी सुरुवात झाली. श्रींच्या मूळमूर्तीस महाभिषेक, काकड आरती आणि महापूजा करण्यात आली. यानंतर सावळ्या विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला भरजरी वस्त्रांसह आभूषणे अलंकार परिधान करण्यात आले. त्यामुळे श्रींची सुवर्णजडीत अलंकृत केलेली लोभसमूर्ती भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली. तदनंतर भाविकांसाठी श्रींचे गर्भगाभारा खुला करण्यात आला. यावेळी असंख्य अबाल वृद्ध चिमुकल्या बालगोपाळांनी श्रींचे मनोभावे दर्शन घेऊन विठुरायाच्या पायावरती माथा टेकावला.
यावेळी मंदिर परिसरात नवचैतन्याचे आणि प्रसन्नतेचे वातावरण होते. आकर्षक आणि सुवासिक फुलांनी तसेच तुळशीमाळांनी मंदिर आणि श्रींचा गर्भ गाभारा सजवण्यात आला होता. यावेळी सर्वत्र तुळशीमाळाचा सुगंध दरवळत होता. आकर्षक विद्युत रोषणाईने सारा मंदिर परिसर प्रकाशमान झालेला दिसून आला.
सावळ्या विठुराया आणि माता रुक्मिणीच्या दर्शनास आसुसलेले वैष्णव
कार्तिकी एकादशी निमित्त सोलापूर शहरातील चौपाड तसेच जुन्या विठ्ठल मंदिर सकाळपासूनच मांदियाळी होती. भाविकांनी आपल्या हातामध्ये तुळशीपत्र आणि नैवेद्य घेऊन आलेल्या सुवासिनी महिला श्रींच्या या गाभाऱ्यात मनोभावे पूजन केले. तर काहींनी फळ व पुष्प अर्पण करत श्रींचे दर्शन घेतले.
मंदिरात धार्मिक कार्यक्रम संपन्न
आज आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात पहाटेपासून धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. पहाटे पाच वाजता श्रींच्या मूळ मूर्तीचे महाभिषेक घालण्यात आला. त्यानंतर काकडा आरती, महापूजा, होम हवन, दुपारी चार ते सहा भजन त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. त्यानंतर रात्री साडेदहा वाजता महाआरती करण्यात आली.
हर्षवर्धन कुलकर्णी, चौपाड विठ्ठल मंदिर पुजारी

















