सोलापूर – जगाच्या कल्याणासाठी संतानी अलैकिक कार्य केले त्यामध्ये संत नामदेवांचे मोठे योगदान आहे म म्हणुन ७५५ वर्ष झाले त्याची दैनंदिन आठवण आल्याशिवाय राहत नाही असे मत विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह ध्यक्ष गुरवर्य गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले.
ते श्री संत नामदेव जनाबाई प्रतिष्ठान आयोजित श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराजांच्या जयंती उत्सवा प्रसंगी श्रीराम मंदिर बा ळी वेस येथे बोलत होते. त्यांनी निरुपणा साठी संत नामदेवांचा भक्ती विना मोक्ष नाही हा सिद्धांत हा अभंग घेतला होता. संत विचारांचे कार्याचे चितन होणे काळची गरज असून नामदेवांनी ज्या काळीत कार्य केले तो काळ खूप कठीण होता त्याचे स्मरण करा.
संत नामदेवांची गाथादैनंदिन वाचन केली तर मनुष्याला मनस्पात भांडणे संत कधीच होणार नाहीत हि नामदेवरायांची ताकद आहे असेही मत औसेकर महाराजां नी व्यक्त केले.
पंजाब मधील सिख परिवारातील लोकांनी नामदेवरायांच्या विचारांचे चितन मनन केले ह्याचा अभिमान वाटतो त्याचे अनुकरण व्हायला हवे. तुळशीमाळेचे महत्व महाराजांनी उदाहरणे देऊन विषद केले.
यावेळी श्रीसंत नामदेव जनाबाई प्रतिष्ठान चे पदाधिकारी समाज बांधव, गुरभक्त मोठ्या संखेने उपस्थित होते

















