बार्शी – ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शीच्यावतीने बार्शीचे नूतन मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांचे बार्शी नगरपालिका बार्शी येथे सत्कार करुन स्वागत करण्यात आले. तसेच विद्यमान मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांचे उपायुक्त, कल्याण डोंबिवली महानगरपालिका येथे प्रमोशन झाल्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने सत्कार करुन हार्दिक अभिनंदन केले.
चव्हाण यांनी बार्शी नगरपालिकेचे कामकाज अतिशय छान केलेले होते. त्याचबरोबर बार्शीचा विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल वाणी, सचिव अजय तिवारी, महिला तालुकाध्यक्ष सायरा मुल्ला हे उपस्थित होते.

















