पंढरपूर – अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसारासाठी “नादब्रह्म” कला फाऊंडेशन करकंब आणि आरती मंडप मनमाडकर परिवार यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या डॉ. रेवती कामत आणि आरती कुंडलकर यांच्या सुश्राव्य अभिजात शास्त्रीय संगीताच्या मैफिलीला पंढरपूरकरांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
सुरुवातीला आरती कुंडलकर, डॉ. रेवती कामत, सुयोग कुंडलकर,संजय देशपांडे, डॉ.अनिल जोशी, शुभांगी जोशी, डॉ.विनय भोपटकर, भगवान भाऊ मनमाडकर,शुभांगी मनमाडकर, ज्ञानेश्वर दुधाणे, रामदास रोंगे, डॉ.प्रसाद कुलकर्णी यांचे हस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.
प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी करत त्रैमासिक संगीत मैफिलीचा उद्देश सांगत पण पं.शौनक अभिषेकी यांच्या मार्गदर्शनाखाली तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे यांचे वतीने मार्च २०२६ मध्ये पं.जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर प्रथम सत्रात डॉ.रेवती कामत यांच्या गायनाने मैफिलीला सुरूवात केली. त्यांनी राग बिहागडा विलंबित तीनतालात सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. नंतर बंदिश,तराणा आणि तुकाराम महाराजांचा अभंग सादर केला.

त्यानंतर द्वितीय सत्रामध्ये आरती ठाकूर -कुंडलकर यांच्या गायनाला सुरुवात झाली त्यांनी सुरुवातीला राग मधुकंस विलंबित ऐकताला मध्ये आए री शाम सुंदरवा सादर करत राग जनसमोहिनी मधील मत्त तालातील बंदिश आणि डॉ प्रभाताई अत्रे यांच्या अजरामर कलावती मधील बंदिशी तन मन धन तोपे वारु, सादर करत सुखा लागी करीशी तळमळ ,अभंग सादर करत सादर करत विठूरायाच्या गजराने भैरवी सादर केली.
यावेळी आरती कुंडलकर यांनी आपल्या स्वरांनी गुरु डॉ प्रभाताई अत्रे यांची क्षणाक्षणाला आठवण करुन देत मैफिल रंगवत कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना तितकीच सुंदर आणि उठावदार साथसंगत हार्मोनियम – सुयोग कुंडलकर, तबला- संजय देशपांडे, पखवाज- ज्ञानेश्वर दुधाणे, टाळ – माऊली खरात आणि तानपुरा- पारुल पारमार यांनी करत कार्यक्रमाला रंगत आणली.
यावेळी पंढरपूर आणि पंचक्रोशीतील कलासाधक कलाप्रेमी आणि कला रसिक श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. कार्यक्रम अगदी वेळेवर सुरू केला आणि पुढेही अशाच पध्दतीने वेळेवर कार्यक्रम सुरू करावा सांगत कार्यक्रम आयोजकांच्या वतीने यशस्वी केला.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आरती मनमाडकर यांनी करत राजेश खिस्ते यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर दुधाणे, धनंजय मनमाडकर, ज्ञानेश्वर खरात, डॉ.अनिल जोशी शुभांगी जोशी, निलेश सावळे, माधुरी सावळे यांनी परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला.


















