उदगीर / लातूर – मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा कुलकर्णी यांचा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा डी बी माल्हाटकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला प्राचार्य उषा कुलकर्णी यांनी विधी सेवा समितीच्या वतीने आयोजित व्यसनमुक्तीपर पथनाट्य महाविद्यालयाच्या माध्यमातून सादर केले होते. विधी जागृती रॅलीत मातृभूमी महाविद्याविद्याल राष्ट्रीय सेवा योजना, कस्तुराबाई नर्सिंग स्कूलच्या माध्यमातून जनजागृती केली होती त्याबद्दल जिल्हा जिल्हान्यायधिश मा. डी बी म्हलाटकर यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा व आतिरिक्तसञ न्यायधिश डी बी म्हालाटकर यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी न्यायाधीश वाय.बी.गमे, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ , न्यायाधीश के.ए.यादव, न्यायधिश बी.आर. झेंडे, उदगीर तालुका विविध संघाचे अध्यक्ष आनंद मुंढे, उपाध्यक्ष गितानंद अक्कनगीरे, आदींची उपस्थिती होती .
मातृभूमी व प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातृभूमी महाविद्यालय कस्तुराबाई नर्सिंग स्कूल व मातृभूमी नर्सिंग स्कूलचे हे सातत्याने शिक्षण व ज्ञानाबरोबरच सामाजिक जाणीवा व संवेदना निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्याबद्दल न्यायधिश डी बी म्हालाटकर यांच्या हस्ते सत्कार म्हणजे मातृभूमीच्या कार्याचा गौरव असल्याचे मत दै एकमतशी बोलतांना प्राचार्या कुलकर्णी यांनी व्यक्त केले.


















