सांगोला – नाझरे ता.सांगोला येथे वीरभद्र जयंती निमित्त मंदिरात शनिवार दि.१५ ते गुरुवार दि.२० नोव्हेंबर अखेर पहाटे ५ ते ६ श्रीस रुद्राभिषेक, स.९.३० ते ११.३० परम रहस्य ग्रंथाचे पारायण, दु.४ ते ५ वीरशैव व रंगनाथ भजनी मंडळाचे भजन, सायं.६ ते ७ शिवपाठ, व सायं.७.३० ते ८.३० वेदांताचार्य श्री श्री श्री १०८ गुरु सिद्ध मनीकंठ शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन, महाआरती व महाप्रसाद वाटप होईल.
शुक्रवार दि.२१ नोव्हेंबर रोजी स.६ ते ६.३० षडाक्षरी मंत्राचा सामुदायिक जप, स.६.३० ते.६.४५ श्री गुरु सिद्ध मनीकंठ शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन व स.६.५१ वा. श्रीस पुष्पवृष्टी होईल. त्यानंतर महाआरती व नाझरे गावातून श्रीच्या पालखीची मिरवणूक निघणार आहे. तरी या मंगल पर्वणीचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन समस्त वीरशैव समाज नाझरे, वझरे, कारंडेवाडी यांनी केले आहे.

















