Wednesday, February 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात

तरुण भारतbyतरुण भारत
November 13, 2025
in marathwada
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

धाराशिव – धाराशिव जिल्ह्यातील साखर व गुळ उत्पादक कारखानदारांनी चालू वर्षातील एफआरपी जाहीर करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना रक्कम द्यावी तसेच खरीप हंगामातील पीकविमा तत्काळ जमा करावा यासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. मागण्याची दखल न घेतल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर गाळप सुरू करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांची चेष्टा केली आहे. ऊसदर न ठरवता गाळप चालू करून शेतकर्‍यांच्या ताटात माती कालवली आहे. आम्ही किती वफादार आहोत हे दाखवण्यासाठी साखर सम्राटांचे बगलबच्चे कारखानदारांच्या दारात शेपूट हलवत आहेत. त्यास प्रशासनही जबाबदार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. त्यामुळे 15 नोव्हेंबरपर्यंत प्रतिटन 3500 रूपये विना कपात ऊसदर जाहीर करावा अन्यथा 17 नोव्हेंबरपासून जिल्ह्यातील सर्व ऊसतोड बंद केली जाईल. ऊस दराबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. त्याचबरोबर साखर कारखान्यातील वजनकाटे ऑनलाईन करण्यात यावे, त्यावर शेतकरी प्रतिनिधीची स्वाक्षरी घ्यावी असेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी राजाभाऊ हाके, सचिन टाले, शहाजी सोमवंशी, धनाजी पेंदे, दुर्वास भोजने, तानाजी पाटील, विष्णू काळे, कमलाकर पवार, अभय साळुंके, चंद्रकांत समुद्रे आदी उपस्थित होते.

Post Views: 39
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मैदानात संभाजी ब्रिगेड ताकदीने उतरणार

Next Post

शहरातील ५४ मीटरचा रस्त्याबाबत महापालिका आयुक्तांची रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत चर्चा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शहरातील ५४ मीटरचा रस्त्याबाबत महापालिका आयुक्तांची रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत चर्चा

ताज्या बातम्या

शहर विकासासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करू 

February 18, 2026

‘हिंद-दी-चादर’ शहीदी वर्षानिमित्त पुणे विभागात विविध उपक्रमांचे आयोजन

February 18, 2026

संत रोहिदास महाराज हे समतेचे, भक्तीचे आणि समाजसुधारणेचे प्रभावी संत – हभप विकास महाराज गोसावी

February 18, 2026

अक्कलकोटच्या पाणीपुरवठयासाठी वर्ल्ड बँक पुरस्कृत निधीतुन अर्थसहाय्य मिळवणार

February 18, 2026

आश्रम शाळेतील दोन विद्यार्थ्यांची इस्रोसाठी निवड

February 18, 2026

पाच जणांना तीन महिन्यासाठी तडीपार 

February 18, 2026

नगरपालिका शाळा क्रमांक दोनमध्ये शैक्षणिक साहित्य प्रदर्शन

February 18, 2026

तुळजापूर नाका परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम 

February 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0685212

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697