Tuesday, July 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली

तरुण भारतbyतरुण भारत
December 8, 2025
in marathwada
0
0
SHARES
24
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जालना – पारध जालना जिल्ह्यातील तालुका भोकरदन पारध येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कुल कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय येथे भारताचे संविधाननिर्माते, प्रज्ञासूर्य, मानवतावादी विचारांचे महान पुरस्कर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव इंग्लिश स्कूल, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात अभिवादन व स्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्यांची जाणीव, संविधानाची ओळख आणि प्रेरणादायी नेतृत्वाचे गुण दृढ करण्याच्या हेतूने हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भव्य पद्धतीने पार पडले

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख पाहुणे शाळेचे सहशिक्षक श्री. संतोष सोनवणे सर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक श्री. लक्कस सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. उपस्थित शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी सामूहिकरित्या मौन पाळून महापुरुषांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण केले

पूजनानंतर इयत्ता सातवीच्या विद्यार्थिनी वंशिका तेलंग्रे आणि श्रद्धा लक्कस यांनी डॉ. बाबासाहेबांच्या जीवनगौरवाचे वर्णन करणारे भावस्पर्शी आणि प्रेरणादायी गीत सादर केले. त्यांचे सादरीकरण ऐकताना उपस्थित प्रेक्षकांच्या मनात आदर, अभिमान आणि राष्ट्रभावनेची अनुभूती दाटून आली

पुढे शाळेतील विविध इयत्तांतील विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या संघर्षपूर्ण प्रवासावर, सामाजिक समतेसाठीच्या त्यांच्या भव्य कार्यावर आणि भारतीय संविधान निर्मितीतल्या त्यांच्या योगदानावर प्रभावी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या भाषणांतून डॉ. आंबेडकरांचे शिक्षणावरील प्रेम, महिलांच्या प्रगतीसाठीचे प्रयत्न, अस्पृश्यता निर्मूलनासाठीची झुंज तसेच “ज्ञान हेच खरे शक्तीस्थान” हा त्यांचा मूलमंत्र विद्यार्थ्यांच्या शब्दांतून उजागर झाला.

अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री. लक्कस सर यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेबांचे चरित्र आणि कार्य केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून ते आजच्या पिढीसाठीही मार्गदर्शक असल्याचे सांगितले.
“डॉ. बाबासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन, त्याच शिक्षणाच्या बळावर जगातील महत्त्वाचे संविधान घडवले. त्यांच्या परिश्रमाची, जिद्दीची आणि दूरदृष्टीची प्रेरणा प्रत्येक विद्यार्थ्याने मनात ठेवली पाहिजे,” असे ते म्हणाले

प्रमुख पाहुणे श्री. संतोष सोनवणे सर यांनी भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांची माहिती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली.
“संविधानाची खरी शक्ती केवळ त्याच्या लिखाणात नसून त्याची अंमलबजावणी करणाऱ्या जागरूक नागरिकांमध्ये आहे,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता सातवीतील विद्यार्थी प्रणव काटोले यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आणि योग्य शब्दांत पार पाडले. त्यांच्या निवेदनातून कार्यक्रम अधिक आकर्षक आणि सुबोध झाला.

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील सहशिक्षक—तबडे सर, सोनवणे सर, पाखरे सर, लोखंडे सर तसेच सहशिक्षिका झोरे मॅडम, राऊत मॅडम, भारती मॅडम आणि नरोटे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी शिस्त, सजावट, सांस्कृतिक सादरीकरण व नियोजन यामध्ये शिक्षकांचे विशेष योगदान होते

समारोपाच्या भाषणात सूर्यकांत गालफाडे यांनी डॉ. बाबासाहेबांच्या सर्वसमावेशक विचारांना उजाळा देत
“भारत देश सर्वधर्मसमभावामुळेच महान बनतो”
हा मूलभूत संदेश विद्यार्थ्यांच्या मनात दृढ केला

Post Views: 185
Previous Post

एमएसपीवर कापूस विक्रीसाठी कपास किसान अ‍ॅपद्वारे नोंदणी अनिवार्य

Next Post

वसमत पोलीस ठाण्यात वाढदिवस सेलिब्रेशन; वर्दीतील उत्सवाच्या कायदेशीरतेवर चर्चेची चाहूल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वसमत पोलीस ठाण्यात वाढदिवस सेलिब्रेशन; वर्दीतील उत्सवाच्या कायदेशीरतेवर चर्चेची चाहूल

ताज्या बातम्या

आंतरजिल्हा मोटारसायकल चोर जेरबंद; १४ चोरीच्या दुचाकी जप्त, जप्त वाहनांची एकूण किंमत ६ लाख ५५ हजार रु

July 14, 2026

सोलापूरच्या त्या तीन इसमांच्या मोबाईल मध्ये सापडले ५० हून अधिक पाकिस्तानी नंबर

July 14, 2026

ड्रोन शो – रोनाल्डोचे जंगी स्वागत…… #viral #news#internationalnews

July 14, 2026

महाराष्ट्रासह २१ राज्यात पुन्हा बरसणार मेघधारा #viral #news #marathinews#nationalnews

July 14, 2026

इन्फ्रा मॅन फडणवीसांचा नवा विक्रम #viral #news #marathinews #maharashtranews

July 14, 2026

वारीत घुसला ट्रक #viral #news #marathinews #maharashtranews

July 14, 2026

मुख्यमंत्री हवालदाराला फोन करतात म्हणे??? #viral #marathinews #solapurnews

July 14, 2026

एक लाखासाठी मंडल अधिकारी विजयकुमार माने अडकले #viral #marathinews #solapurnews

July 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0975614

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!