सोलापूर : नीलकंठ को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक विश्वनाथ करवा यांच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून दोन संस्थांना प्रेरणा निधी वितरण कार्यक्रम पार पडला.
सम्राट चौक येथील नीलकंठ को-ऑप बँकेच्या सभागृहात आयोजित या उपक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ धनंजयजी माने, नीलकंठ को-ऑप बँकेचे व्हाईस चेअरमन पद्मा भुतडा, नीलकंठ बँकेचे संचालक कौस्तुभ करवा आदी मान्यवरांची उपस्थिती होती. दोन सामाजिक संस्थांना हा निधी देण्यात आला. यावेळी राजस्थानी विकास मंडळाचे अध्यक्ष श्री.माणिकचंद डागा व आस्था रोटी बँक फौंडेशनचे श्री.विजय गंगाधर छचुंरे यांना प्रत्येकी 21 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सुत्रसंचलन बरखा सारडा यांनी केले तर आभार कौस्तुभ करवा यांनी मानले. याप्रसंगी नीलकंठ को-ऑप बॅकेचे संचालक रमेश राठी, चंद्रकांत तापडिया, शरद कालानी, सचिन कोठारी, अभिजीत चिल्लाल, जमनादास भुतडा, CA आनंद झंवर यांच्यासह बॅकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष श्री राजू राठी, बांधकाम व्यावसायिक किशोर चांडक, श्री सिद्धराम पाटील, सौ रेखा माने हे ही उपस्थित होते.
यावेळी ॲड. धनंजय माने म्हणाले, विश्वनाथ करवा हे महाविद्यालयीन जीवनापासूनच समाजकार्यात सक्रिय होते. सामाजिक कार्यात त्यांचे निस्वार्थपणे मोठे योगदान होते. आज त्यांच्या सौभाग्यवती नंदा करवा याही त्यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवत आहेत. करवा परिवाराच्यावतीने आजही विविध सामाजिक, शैक्षणिक राबविले जातात, हे स्तुत्य कार्य आहे.



















