भोकरदन / जालना : शहरातील आधीच अरुंद रस्ते आणि त्यावर असलेल्या अतिक्रमणाने वाहतुकीची नेहमी कोंडी होत असल्याने वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरश वैतागले आहेत, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज तसेच सिल्लोड कॉर्नर वरिल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य चौकात अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने थेट रस्त्यावरच थाटली आहे.
यातच खरेदीसाठी येणाऱ्या टु व्हिलर, फोर व्हिलर वाहनधारकांची मोठी गर्दी होतअसून रोजच छोटे मोठे अपघात होत असल्याने नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याने नागरिकांनी या प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे, दरम्यान शहरातील अरुंद रस्त्यावरून आपली वाहने काढताना अनेक वाहनधारकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान शहराबाहेरून वळण रस्ता व्हावा ही गेल्या कित्येक दिवसांपासून नागरीकांची मागणी होत आहे, मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शहराबाहेरील वळन रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही, विशेष म्हणजे दोन ते तीन वर्षाअगोदर या वळण रस्त्यासाठी सर्वे करुन देखील उपविभागीय कार्यालयाच्या वतिने या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अहवाल सोपविण्यात आला होता, मात्र यावर नंतर कुठलाच निर्णय झाला नसल्याने आजमितीस अधांतरीच राहीला आहे,परिणामी शहरातून जाणाऱ्या-येणाऱ्या जड वाहनांमुळे वाहतूकीमुळे अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पुन्हा वळण रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.मात्र अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला शहराबाहेरील वळण रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही.
विशेष म्हणजे या शहरातून हैदराबाद, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश आदी राज्यासह नांदेड, जालना, परभणी, औरंगाबाद, जळगाव, खांदेश तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, खामगाव आदी ठिकाणी दररोज या शहरातून शेकडो अवजड वाहने येत-जात आहे. अवजड वाहनांमुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे, तसेच शहरात सतत छोटेमोठे अपघात होत आहेत. त्यामुळे वळण रस्त्याचा प्रश्न सोडविण्याची गरज आहे.

















