सोलापुर — अनुदानित खाजगी अल्पसंख्यांक प्राथमिक शाळेतील अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा.अशी मागणी प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहीती डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.
डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद,महाराष्टृ राज्य शिक्षक सेना,युवक शिक्षक कर्मचारी संघटना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या शिष्टमंडळाने प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांची भेट घेतली.या शिष्टमंडळात सोमेश्वर याबाजी,विनोद आगलावे,शाम कदम, अ.गफुर अरब,काशिनाथ बडुरे,जयंत गायकवाड आदी उपस्थित होते.खाजगी प्राथमिक अल्पसंख्याक शाळेतील मराठी,कन्नड व उर्दु माध्यमातील ९९ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.यातील काही शिक्षकांचे समायोजन तात्पुरत्या स्वरुपात करण्यात आले आहे.सर्वच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन कायमस्वरुपी करण्यात यावे.समायोजन केलेल्या पण संबंधित संस्थेने रुजु करुन न घेतलेल्या बिगर अल्पसंख्यांक व अल्पसंख्यांक शाळेतील शिक्षकांचे वेतन मुळ शाळेतुन अदा करण्याचे आदेश संबंधित कार्यालयास देण्यात यावेत, समायोजन प्रक्रीया शासन निर्णयानुसार व तातडीने राबविण्यात यावी या मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.सर्व प्रक्रीया शासन निर्णयानुसार व पारदर्शकपणे राबविण्यात येइल.असे आश्वासन शिक्षणाधिकार्यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले.या निवेदनावर आप्पाराव इटेकर,विनोद आगलावे,वल्लभ चौगुले व अ.गफुर अरब यांच्या सह्या आहेत.
Post Views: 13