
सोलापूर : कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आ. रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे या मागणीसाठी पाठपुरवठा करण्यात येत असून दि. 20 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या बैठकीच्या निर्णयाची/इतिवृत्ताची तात्काळ अंमलबजावणी व्हावी व शासनाने आवश्यक ते परिपत्रक काढावे याकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाच वेळीस सर्व जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन व निवेदन देण्यात आले.
जर येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये आदिवासी कोळी समाजाचा प्रश्न मार्गी न लावल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर माजी आ. रमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोळी महासंघ हे तीव्र आंदोलन सुरू करणार असल्याची माहिती महासंघाचे युवा प्रदेशाध्यक्ष ॲड.चेतन पाटील यांनी दिली त्यांच्यासोबत कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील कार्याध्यक्ष शंभू माने, शहर अध्यक्ष अप्पासाहेब हिप्परगे, नगरसेवक विशाल शिरसाट, तालुकाप्रमुख ऋषी लोणारी, युवा जिल्हाध्यक्ष आप्पा प्याटी यांचेसह आदिवासी कोळी समाजातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






















