बिलोली – सगरोळी येथील अल्पभुधारक शेतकरी सिध्दापुरे कुटुंबाच्या कौलारू घराला विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत घर जळुन खाक झाल्याने उघड्यावर पडलेल्या त्या पिडीत कुटुंबाची संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी संस्थेचे संचालक रोहीत देशमुख यानी भेट घेऊन अर्थिक मदतीचा आधार देऊन धिर दिल्याने गावकऱ्यांकडुन कौतुक होत आहे.
सगरोळी येथे गेल्या काही दिवसापूर्वी विजेच्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीच्या भडक्यात अल्पभुधारक शेतकरी हाणमंत दिगंबर सिद्धापुरे यांचे घर त्या आगीत जळुन खाक झाल्याने दागदागिने, नगदी रोकड, अन्नधान्य, कपडे यासह संसार उपयोगी वस्तु जळुन खाक झाले व अन्य काही कुटुंबाच्या घराचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात जवळपास २५ लाखाचे नुकसान झाल्याचा अंदाज होता. सर्वाधिक नुकसानीचा फटका हाणमंत सिध्दापुरे यांच्या कुटुंबास बसला आसुन उघड्यावर पडलेल्या त्या पिडीत कुटुंबांची भेट गेल्या अनेक दशका पासुन संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेञात झेप घेत आसताना या पलीकडे सामाजिक क्षेञात गगन भरारी घेताना वेगवेगळ्या संकटात सापडलेल्या गोरगरीबांच्या मदतीसाठी धाव घेणारे सगरोळीचे छञ म्हणून विविध भागातील हजारो कुटुंबाचे आधारस्तभ म्हणुन ज्यांचे सर्वञ नावलौकीक आहे. त्या सगरोळी येथील देशमुख परीवाराच्या वतीने रोहीत देशमुख संचालक संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी यानी उघडयावर पडलेल्या त्या पिडीत कुटुंबाची दि. २८ डिसेंबर रोजी भेट घेऊन ४५ हजार रुपयाचा धनादेश देऊन यापुढे ही त्या शोकाकुल कुटुंबास मदत करण्याचे अश्वासन देत धिर दिला. यावेळी सिध्दापुरे कुटुंबानी समाधान व्यक्त करत दानशुर देशमुख परीवारांचे आभार मानले. तर शासनाकडुन अद्याप ही मदत मिळाली नसल्याने जनतेतुन संतप्तजनक भावना व्यक्त होत आहे. यावेळी दतु कोटनोड, श्रीनिवास दमय्यावार, वैभव भोसले, भगवान सिध्दापुरे, मनोहर देगलरे, सतीश बुच्छलवार, चुन्नमवार संजय, माणिक लोकडे याच्यासह आनेकांची उपस्थिती होती.























