माळशिरस – कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार यांना महाराष्ट्र शासन, शासन निर्णय दि. १६ मार्च २०२४ नुसार प्रतिमहा ५ हजार रूपये मानधन देण्यात येते. राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेंतर्गत सन २०२६-२७ मध्ये पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या पोर्टवर
http://aaplesarkar.
mahaonline.gov.in संकेतस्थळावर दि. १ ते ३१ जुलै २०२६ पर्यंत मुळ दस्ताऐवजासह ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे यांनी केले. यावेळी विस्तार अधिकारी ए.एम सरवदे उपस्याथित होते. योजनेसाठी लाभार्थ्यांची पुढीलप्रमाणे पात्रता आवश्यक आहे १) ज्यांचे वय ५० पेक्षा जास्त आहे. दिव्यांगांना वयाची अट १० वर्षाने शिथिल करण्यात येत आहेत (दिव्यांगांना वयोमर्यादा ४० वर्ष). २) ज्यांचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी १५ वर्षे आहे. ३) ज्यांनी साहित्य व
कलाक्षेत्रात सातत्यपूर्ण, दर्जेदार व मोलाची भर घातली आहे. ४) वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा /परितक्त्या दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य राहील. ५) कलाकाराचे सर्व मार्गानी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६०,०००/-पेक्षा जास्त नसावे. ६) ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार. ७) केंद्र किंवा राज्य शासनाच्या महामंडळे इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार, कलाकार /साहित्यिक महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे.या सर्व माहितीसाठी पंचायत समिती कार्यालयात पुजारी मॅडम यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
आवश्यक दस्ताऐवज
वयाचा दाखला, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञा पत्र, पती व पत्नी एकत्रीत फोटो (लागू असल्यास), बँक पासबुक, अपंगत्व दाखला (लागू असल्यास), राज्य / केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास), नामांकित संस्था / व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागू असल्यास), विविध पुरावे.
Post Views: 33