सोलापूर – पुणे येथील महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘अखिल भारतीय राजभाषा हिंदी परीक्षेत’ वडाळा येथील श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाने
घवघवीत यश संपादन केले असून प्राचार्या डॉ.वैशाली जितेंद्र साठे यांना महात्मा गांधी आदर्श प्रधानाचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रशालेतील शिक्षक आर.व्ही.चौगुले यांना आदर्श हिंदी राजभाषा भूषण,जी.डी.घोलप यांना हिंदी राजभाषा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. दहा विद्यार्थी परिक्षेला बसले होते.त्यात वेदिका मोहिते,राघव घाडगे, अपेक्षा कदम,श्रेया गाडे,सुरभी निकम,सुफियान बागवान, सार्थक माने,पूर्वा गायकवाड, धनश्री कोळी,स्वराज सातपुते हे अ श्रेणीत उत्तीर्ण झाले.त्यांना प्रतिभा पुरस्कार देण्यात आला.या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक बळीरामकाका साठे, संस्थेचे अध्यक्ष व वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे, संचालक जयदीप साठे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
फोटो ओळी – पुणे येथील महात्मा गांधी राजभाषा हिंदी प्रचार समितीच्या वतीने वडाळा येथील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.वैशाली जितेंद्र साठे यांना महात्मा गांधी आदर्श प्रधानाचार्य पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.त्याबद्दल प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी छायाचित्रात प्रा.सतीश नागणे,प्रा.पी.आर.पाटील, हनुमंत रावळे, रविंद्र चौगुले,जी.डी.घोलप आदी.
























