Monday, June 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत डोंगरे पिता-पुत्राचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश 

तरुण भारतbyतरुण भारत
January 16, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक रणधुमाळी सुरु झाली असतानाच मोहोळ तालुक्याच्या राजकारणात भूकंप झाला असून ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे व त्यांचे पुत्र जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी भाजपातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. 

  दरम्यान डोंगरे पिता-पुत्राच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे मोहोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची समिकरणे आता बदलणार असून जिल्हाध्यक्ष उमेश पाटील हे विधानसभा निवडणुकीतील सर्वपक्षीय आघाडीचा पॅटर्न राबवून आघाडीची वज्रमूठ एकवठून पुन्हा अनगरकरांना नेस्तनाभूत करणार असल्याचे यावरुन स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या उमेश पाटील यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दुखावलेल्या माजी आमदार राजन पाटील व त्यांच्या चिरंजीवांनी भाजपाचा रस्ता धरला. तर नगरपरिषदेच्या निवडणुकीत विक्रांत पाटील यांनी ना.अजित पवार यांनाच आव्हान दिले. यापार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पुन्हा एकदा मोहोळ तालुक्यात आघाडीचा नारा दिला आहे. 

   जिल्ह्याचे दुसरे ज्येष्ठ नेते बळीरामकाका साठे यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सन्मानाने घेऊन जिल्हाध्यक्ष पाटील यांनी संघटन कौशल्य् सिद्ध केले आहे. तसेच करमाळ्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांना सोबत घेऊन तसेच अक्कलकोटचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे चिरंजीव शिवानंद पाटील, संजीव पाटील यांनाही पक्षात घेऊन ना.अजितदादांच्या पक्षाची पकड  जिल्ह्यात मजबूत करण्यावर भर दिला आहे. 

    गुरुवारी बारामती येथे लोकशक्ती परिवाराचे मनोहरभाऊ डोंगरे व विजयराज डोंगरे यांना ना.अजितदादांच्या हस्ते पक्षात आणून मोहोळ तालुक्यातील बदलत्या राजकीय समिकरणाचे रणशिंग फुंकले आहे. डोंगरे यांना तालुक्यात मानणारा मोठा वर्ग आहे. एककाळ मनोहर डोंगरे व राजन पाटील या जोडीने तालुक्यातील नेतृत्वाची घडी एकसंध ठेवली होती. मात्र, अलिकडे दोन्ही नेते विभक्त झाले. विजयराज डोंगरे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. मात्र, आता राजन पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यामुळे डोंगरे यांनी ना.अजितदादांचे नेतृत्व् मान्य केले आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे मोहोळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची समिकरणे बदलणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. डोंगरे पिता-पुत्रासह सुनील पाटील, बाबूराव कोकाटे, पैलवान नितीन निळे, दीपक पुजारी, सर्जेराव चवरे, सहदेव पुजारी, दीपक गवळी, सादिक तांबोळी, महावीर पुजारी, सागर थोरात, मुन्ना बचुटे या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

 चौकट 

 राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ज्यांना मोठे केले त्यांनीच ना.अजितदादांशी गद्दारी केली. मोहोळ तालुक्याची माती गद्दारांना कधीच माफ करीत नाही. हे विधानसभा निवडणुकीत इथल्या स्वाभिमानी मतदारांनी दाखवून दिले आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांची भाजपामध्ये जाण्याची कुणकुण तालुक्यातील जनतेला लागली. त्यामुळे त्या निवडणुकीत त्यांना जनतेने स्विकारले नाही. आता तर उघडपणे त्यांनी पाठ फिरविली. त्यामुळे विधानसभा निवडणूक झाँकी है. जिल्हा परिषद निवडणूक अभी बाकी है – उमेश पाटील, जिल्हाध्यक्ष 

फोटो ओळी – मोहोळ तालुक्यातील ज्येष्ठ नेते मनोहरभाऊ डोंगरे व विजयराज डोंगरे यांनी गुरुवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी छायाचित्रात ना.पवार,  डोंगरे पिता-पुत्र, जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आदी.

Post Views: 68
Previous Post

पिलीव व आसपासच्या परिसरात मकर संक्रांत सण उत्साहात साजरा

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज – तहसीलदार किरण जमदाडे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज - तहसीलदार किरण जमदाडे

ताज्या बातम्या

महाराष्ट्रातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर लगाम घाला

महाराष्ट्रातील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर लगाम घाला

June 21, 2026

सर्वधर्मीय अविवाहित तरुण व तरुणींसाठी वधू वर सूचक मेळावा

June 21, 2026
पारधी समाजाच्यावतीने एम.ए.सी.बी. चे प्रमुख औंडीकर यांचा सत्कार

पारधी समाजाच्यावतीने एम.ए.सी.बी. चे प्रमुख औंडीकर यांचा सत्कार

June 21, 2026
गांधी नाथा रंगजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

गांधी नाथा रंगजी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

June 21, 2026

राज्यसेवेत २६५ पदांची मेगाभरती; पण उपजिल्हाधिकारी पदाचा अद्याप पत्ता नाही!

June 21, 2026

लग्नाचे आमिषाने 21 वर्षीय तरुणीवर सतत लैंगिक अत्याचार

June 21, 2026

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये 21 जून अर्थात 12 वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
पदमनगर बास्केटबॉल अकॅडमीच्या वतीने आंतरर्राष्ट्रीय योग दिन  साजरा

पदमनगर बास्केटबॉल अकॅडमीच्या वतीने आंतरर्राष्ट्रीय योग दिन  साजरा

June 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0928676

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697