Monday, May 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज – तहसीलदार किरण जमदाडे

तरुण भारतbyतरुण भारत
January 16, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – जिल्हा परिषद पंचायत व समिती निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना केवळ एका ‘सूचक’ आवश्यकता असणार आहे. त्यामुळे उमेदवारांची सूचक शोधण्याची कटकट कमी होणार आहे.  दक्षिणमध्ये  जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी १६ जानेवारीपासून ७ फेब्रुवारी पर्यंत आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यात येणार आहे.

त्यामुळे राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन दक्षिणचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किरण जमदाडे यांनी केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात आयोजित पत्रपरीषदेत तहसीलदार जमदाडे यांनी माहीती दिली.


           दक्षिण तालुक्यातील ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गणासाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून  दक्षिणमधील २४७ मतदास केंद्रांमधून २ लाख ६७ हजार २३७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये एक लाख १५ हजार २२८ पुरूष, एक लाख ८ हजार १२३ महिला तर १६ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. यामध्ये ४ हजार ३७८ दुबार मतदार आहेत. त्यांच्याकडून एकाच ठिकाणी मतदान करण्याचे हमीपत्र घेण्यात आले असून प्रत्येक मतदान केंद्रावर हमीपत्र पोहोच करण्यात येणार आहे. दोन्ही ठिकाणची सहीची खात्री झाल्यानंतर मतदान करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया १६ जानेवारी ते २१ जानेवारीपर्यंत असून २२ जानेवारी रोजी अर्जांची छाननी होणार आहे . २३ जानेवारी ते २७ जानेवारी दरम्यान अर्ज माघार घेण्याचा कालावधी आहे. मात्र यावेळी रविवार २५ जानेवारी आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनमुळे शासकीय सुट्टी असल्याने या काळात अर्ज माघारीची प्रक्रिया बंद राहणार आहे. त्यानंतर २७ जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्ह वाटप करून अंतिम उमेदवारी निश्चित केली जाणार आहे . ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीस सुरूवात होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्यासाठी दोन हजारपेक्षा जास्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्यांना तीन टप्यात प्रशिक्षण देण्यात रेणार आहे. तसेच उमेदवारांना सर्व प्रकारचे परवाना देण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात येणार आहे. यावेळी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार आदर्श मतदान केंद्र निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच आचारसंहितेवर लक्ष ठेवण्यासाठी  स्थिर सर्वेक्षण पथक १८ ,फिरते सर्वेक्षण पथक १२ ,व्हिडिओ सर्वेक्षण पथक ०४  विशेष व्हिडिओ पथक ०२ असणार आहेत.
७ फेब्रुवारी रोजी  ‘एस.आर.पी. कॅम्प’  येथे मतमोजणी प्रक्रीया पार पडणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
…..
चौकट
….
* सर्व परवानासाठी एक खिडकी योजना
* २५ व २६ जानेवारी रोजी अर्ज माघार प्रक्रीया बंद
* दुबार मतदारांकडून एकाच ठिकाणी मतदान करण्याचे घेतले हमीपत्र
* एसआरपी कॅंप येथे मतमोजणी प्रक्रीया
* ३६ विविध पथकाद्वारे आचारसंहितेचे पालन व नियंत्रण
* दक्षिणचे सर्व सीमांवर स्थिर सर्वेक्षण पथक नियुक्त
* मतदान केंद्रावर सर्व सोईसुविधा देण्यात येणार
* आदर्श मतदान केंद्र उभारणी करणार
* निर्भय व शांततेत मतदान पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज
* दोन हजार कर्मचार्‍यांना तीन टप्यात प्रशिक्षण  

Post Views: 41
Previous Post

ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत डोंगरे पिता-पुत्राचा उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश 

Next Post

य.च.महाविद्यालयात एक दिवसीय NEP अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

य.च.महाविद्यालयात एक दिवसीय NEP अभ्यासक्रम कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

वैरागमध्ये दगडाने ठेचून केला मित्राचा खून

May 4, 2026

माधवनगर परिसरात भर दिवसा एकाचा मर्डर

May 4, 2026

बंगालमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे चित्र

May 4, 2026

भाजपा 194 आणि टी एम सी 91 #public #viral

May 4, 2026

त्या नराधमाला सोडायचे नाहीच खासदार डॉ ज्योती वाघमारे

May 4, 2026

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साधला पीडित चिमुकलीच्या बाबांशी संवाद #public #viral #maharashtranews

May 4, 2026

त्या चिमुकलीवर झाले पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार #public #viral #marathinews

May 4, 2026

उपमुख्यमंत्री म्हणाल्या मी पण एक आई शिक्षा व्हायलाच पाहिजे #public #marathinews #solapurnews

May 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0845515

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697