माहूर – राज्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्राचे ठिकाण तथा तालुकास्थळ असलेल्या माहूर शहरात दररोज हजारो वाहने येतात तर गडावर देवदर्शनाला जाण्यासाठी भाविक चारचाकी वाहना सोबतच मोठ्या प्रमाणात ऑटोरिक्षाचा वापर करतात.त्यामुळे अपघात होऊ नये यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून पुढील बाजूस पांढरे, बाजूला पिवळे आणि पाठीमागे लाल रिफ्लेक्टर लावणे आवश्यक आहे , रात्रीच्या वेळेस प्रवास करताना या वाहनांवरील रिफ्लेक्टिव टेप (परावर्तक टेप) रिफ्लेक्ट होतात आणि दुसऱ्या वाहनास अंदाज येऊन अपघाताची शक्यता कमी होते, असे प्रतिपादन आरटीओ इन्स्पेक्टर अभिजित कोळी यांनी केले.
दि. २२ जानेवारी रोजी माहूर शहरातील बाहेरून आलेली सर्व वाहने आणि रिक्षांना रिफ्लेक्टर टेप कश्या प्रकारे लावावे याचे मार्गदर्शन करण्यात आले आणि शेकडो रिक्षांना रिफ्लेक्टिव टेप चिटकविण्यात आले. यावेळी इन्स्पेक्टर अभिजीत कोळी, इन्स्पेक्टर श्रीमती रेणुका राठोड, आरटीओ इन्स्पेक्टर मंगेश गवारे तसेच वाहन चालक प्रकाश जायभाये उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना आरटीओ कोळी म्हणाले कि,”वाहनांवरील रिफ्लेक्टिव टेप (परावर्तक टेप) हा एक विशेष प्रकारचा चिकट टेप आहे, जो रात्री किंवा कमी प्रकाशात वाहनांची दृश्यमानता वाढवण्यासाठी वापरला जातो, ज्यामुळे इतर वाहनचालकांना वाहनाची रूपरेषा (outline) स्पष्ट दिसते आणि अपघात टाळता येतात. हा टेप प्रकाशकिरण थेट त्यांच्या स्रोताकडे (हेडलाइट्स) परावर्तित करतो, ज्यामुळे वाहन अधिक तेजस्वी दिसते.
विशेषतः ट्रक, बस, ऊस वाहने आणि इतर मोठ्या वाहनांच्या कडा दर्शवून रात्रीच्या वेळी आणि खराब हवामानात सुरक्षितता वाढवते. या टेपमुळे
वाहनांची स्पष्ट ओळख पटवून अपघात, विशेषतः मागील बाजूस धडकणे टाळण्यास मदत होते.वाहनांना दूरून पाहणे सोपे होते, ज्यामुळे ड्रायव्हर्सना प्रतिक्रिया देण्यासाठी वेळ मिळतो.
अनेक ठिकाणी, विशेषतः व्यावसायिक आणि मोठ्या वाहनांसाठी रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे कायद्याने अनिवार्य आहे. या रिफ्लेक्टीव टेपचे लाल आणि पांढरे, पिवळे तसेच उच्च तीव्रतेचे असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.
थोडक्यात, हा टेप वाहनांसाठी एक संरक्षक कवच म्हणून काम करतो, जो कमी प्रकाशातही वाहन सहज दिसण्यास मदत करतो आणि रस्त्यावरील सुरक्षितता सुनिश्चित करतो.असे सखोल मार्गदर्शन त्यांनी उपस्थित वाहनचालकांना केले.
यावेळी इन्स्पेक्टर अभिजीत कोळी यांनी गडावरील येणारी जाणारे वाहने सुरक्षित रहावी अपघात होऊ नये यासाठी घाटासह वळणदार रस्त्यावर विविध प्रकारचे बॅनर सूचनाफलक लावून भाविक व नागरिकांचा प्रवास सुरक्षित व्हावा अपघात होऊ नयेत यासाठी शासन नियमानुसार सर्व उपाययोजना करण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले नागरिकांनी नियमांचे पालन करावे लहान मुलांना वाहने चालवू देऊ नये तसेच वाहनाची कागदपत्रे इन्शुरन्स बनवून घ्यावीत सुरक्षेसाठी हेल्मेटचा वापर करावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

























