लोहा – कृर्षी उत्पादन बाजार समितीने ज्या व्यापाऱ्याला मोढां परिसरात दुकान नाही. जो व्यापारी भाड्याने दुकान घेऊन व्यवसाय करतो अशा व्यापाऱ्याला कृउबा समितीने ठराव घेऊन मोकळी जागा देण्याचे ठरले.त्या व्यापाऱ्यांनी टिन पञा शेडचे दुकान तयार करुन व्यवसाय करावा अशा निर्णय झाला .मोकळी जागा घेतलेल्या व्यापाऱ्यांनी स्वतः खर्च करुन दुकाने तयार केली.याच्यातुन वादाची ठिणगी पेठला.संचालकांच्या विरोधाने वखार मंडळ येथील मोकळ्या जागेवरील दुकाने रद्द करण्यात येणार अशी चर्चा जोरात चालु आहे.
पण १५ दुकानाचा व्यवाहार चौ-हाट्यावर आला. सचिव व संचालक यांच्या वादाला तोंड फुटले.
संचालक व सचिव यांच्यात अविश्वास निर्माण झाल्याने घडलेल्या घटना बाहेर येत आहेत.
कृर्षी उत्पादन बाजार समितीच्या निवडणूकीत आ.प्रताप पाटील चिखलीकर यांना बाजार समिती मधुन दुर् ठेवण्यासाठी तत्कालीन व सध्या नगर पालिकेचे नगराध्यक्ष शरद पाटील पवार यांनी सर्वांची एक जुट करुन निवडनूक पॉनल तयार करुन प्रचार केला त्यामध्ये माजी आ.रोहिदास चव्हान,माजी आ.श्यामसुंदर शिंदे,माजी आ.मोहन आण्णा हांबर्डे प्रा मनोहर धोंडे,माजी आ.शंकर आण्णा धोंडगे यांनी एकजूट दाखवून कृउबा समितीवर सत्ता काबिज केली सभापती विक्रांत शिंदे यांची निवड मानली जात होती.
उपसभपतीच्या निवडीत चुरस निर्माण झाली.मोहन आण्ण हांबर्डे कडुन दत्ता दिघे नशिब आजमित होते.आणि शरद पवार यांच्या कोठ्यातुन आण्णा पाटील पवार यांचे नाव पुढे येत होतं अखेर अण्णा पवार यांना उपसभापती पद मिळनार असे मानली जात होते पण प्रत्येकाला संधी मिळावी म्हणुन एक ..एक वर्षे उपसभापतीचा कार्येकाळ केला पण सत्ता आणि नेते संत्तार झाले उपसभापतीला अधिकचा कार्येकाळ मिळाला उपसभापती पद सोडण्याची तयारी दाखवत नसल्याने यांच्यात वाद पेटला.
उपसभापतीच्या मनमानीचा व गैरकारभाराची संचालकात धुसफुस सुरु झाली.
या प्रकरणात शासनाचा प्रतिनिधी म्हणुन सचिव काम करत असताना लोक प्रतिनिधी बरोबर हिस्सा घेतो हि बाब संचालकाल खटकली सचिवाला निलंबित करुन चौकशी करावी अशी व्यापारी , संचालक व शेतकऱ्यांत चर्चा आहे.
मोकळ्या जागेवर दुकाने बांधने किंव्हा तयार करणे वरिष्ठाची मानेता घेणे गरजेचे आहे. या प्रक्रियेत दुकाने तयार केल्यावर कागदी ताळमेळाचा खेळ सुरु केला आहे.
दुकाने तयार करताना जाहिर प्रगटन करावे लागते व व्यापाऱ्याला आव्हान करुन बैठित ठरले जाते पण प्रकिया गुपचुप केली बाजार पेठेत आजही 40 ते 50 व्यापारी भाड्याच्या दुकानात व्यापार करतात हि सतेता आहे .
ज्याला दुकान दिले कृउबा समिला आतपर्यंत किती फायदा झाला याची चौकशी करावी ,ज्यांनी फायदा केला त्याला दुकान का दिले नाही याची चौकशी करावी.सचिव व उपसभापती यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा अशी मागणी होत आहे.पण सचिवांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे शिवाजी महाराज चौकातील 25 मोकळ्या जागेवर देण्यात येणारे दुकाने रद्द करण्यात येणार अशी चर्चा जोरात चालु आहे. सभापती या प्रक्रियेवर काय निर्णय घेतात कि सामिल होतात हा मोठा चर्चेचा विषय आहे.
























