सोलापूर- स्वातंत्र सैनिक नगर येथील स्वातंत्र सैनिक नगर सांस्कृतिक बहुद्देशीय युवक मित्र मंडळाचे आयोजित साक्षात्कार गणपती मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र दंतकाळे यांचे हस्ते पूजा संपन्न झाले.
सकाळी होमहवन झाले सदर पूजा कर्ते,अभिलाष स्वामी, आनंद पोटाबत्ती,दीपक तडलगी,श्रीकांत कोरजगावकर हे होते.नंतर पाळणा कार्यक्रम होऊन आरती प्रभाग क्र 9 चे नवनिर्वाचित नगर सेवक मेघनाथ येमूल यांचे हस्ते श्री चे आरती झाले.त्यानंतर मेघनाथ येमूल,शेखर इगे, कादंबरी मंजुळे,पूजा वाडेकर यांचे सत्कार करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मीकांत दंडी, आभार प्रदर्शन ॲड सिद्धाराम कोरे यांनी केले.
सदर कार्यक्रमावेळी मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र दंतकाळे,सोसायटीचे चेअरमन सुनील रसाळे,स्वप्नील सातपुते,अभिलाष स्वामी,नितीन बळते, दिनेश तडलगी, राजू कट्टा,संकेत दिवटे,अभिलाष बोलते, दीप मामदयाल,आनंद पोटाबत्ती,शेखर बिराजदार व बहुसंख्य महिला उपस्थित होते

























