अकलूज – माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आली आनंदा नगर येथील आनंदी गणेश मंदिरामध्ये कीर्ती ध्वजसिह मोहिते पाटील यांनी श्री गणेशाची अभिषेक व पूजा केली यावेळी स्वयंप्रभादेवी मोहिते पाटील उपस्थितीत होत्या अथर्वशीर्ष पठाण भजन पाळणा व जन्मात्सव साजरा करण्यात आला प्रसादाचे वाटप करण्यात आले
अकलूज येथील पुरातन पेशवेकालीन मंदिरामध्ये उजव्या सोंडेची गणेश मूर्ती असून ब्राह्मण सेवा संघ व गणपती मंदिर ट्रस्ट यांच्यावतीने गणेश याग करण्यात आला राजेंद्र सूर्यवंशी यांनी संपत्नीक पूजा केली यावेळी माजी सरपंच किशोर सिंह माने पाटील व हजारो भक्त उपस्थितीत होते महाप्रसादाचे वाटप करण्यात आले लोकमान्य गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मंडळाचे सदस्य देवचंद ओसवाल यांनी श्री गणेशाची पूजा केली
यावेळी राजेंद्र आर्वे, उमेश शेटे, बाळासाहेब सणस, आप्पा खडके व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थितीत होते महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ भाजी मंडई येथील मंदिरामध्ये रमेश महादार यांनी पूजन केले यावेळी अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थितीत होते गणेश जन्मोत्सवा नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले शिवरत्न गणेशोत्सव मंडळ येथे राहुल किसनपुर या नवीन दापत्यांनी श्री गणेशाची पूजन केले
यावेळी उदय शेटे व त्यांच्या सहकार्यांनी प्रसाद वाटप केले छत्रपती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गोपाळ सोमनाथ गुळवे यांनी पूजन केले मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर धवल सिंह मोहिते पाटील हे आहेत पद्मजादेवी प्रताप सिंह मोहिते पाटील यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतले यावेळी पाच हजार भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले शेटे वस्ती यशवंतनगर येथेही गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला
























