सोलापूर – श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळ वसंत विहार फेज ३ गणेश जयंती निमित्त श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळातर्फे विविध कार्यक्रम होम हवन -गुलाल पाळणा- महाआरतीचे आयोजन केले होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती ही सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे व शिवसेना शहरप्रमुख महेश धाराशिवकर, प्राध्यापक उत्तरा बचुटे / बरडे, नगरसेवक बिज्जु प्रधाने, मंदाकिनी तोडकरी यांच्या हस्ते महाआरती व महाप्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
शिवसेना सोलापूर शिवसेना शहर संघटक व मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश जगताप, उत्सव अध्यक्ष सुहास लोंढे, शाखाप्रमुख राहुल परदेशी, राजेश पानकर, विशाल धंगेकर, दत्तात्रय सुरवसे, विवेक रुपनर, वैभव पाटील, मंगेश शिरसागर, तानाजी पाटील आदी महिला व पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते


























