Wednesday, April 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या बेपत्ता झालेल्या नगरसेवकांचे लागले पोस्टर; पोलिसाकडेही  ‘मिसिंग’ची तक्रार 

तरुण भारतbyतरुण भारत
January 26, 2026
in crime
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई – कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपा – शिवसेना शिंदे गटामध्ये सत्ता स्थापनेसाठी चढाओढ सुरु असताना आपले चार नगरसेवक बेपत्ता झालेल्याने संतप्त झालेल्या शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याबद्दल तक्रार देण्यात आली असून ते हरविले आहेत, असे पोस्टर शहरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

 निवडणूक निकालानंतर नगरसेवकांच्या पळवापळवीच्या संशयाने राजकीय वातावरण तापले आहे. ठाकरे गटाचे ११ उमेदवार निवडणुकीत विजयी झाले मात्र त्यापैकी चार नगरसेवक १६ जानेवारीपासून बेपत्ता आहेत. मधुर म्हात्रे, कीर्ती ढोणे, राहुल कोट आणि स्वप्नील केणे यांचा समावेश आहे. अशी त्यांची नावे असून त्यांना शिंदे गटाने फोडून अज्ञातस्थळी पाठवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.त्यामुळे कल्याण पूर्व परिसरात या नगरसेवकांचे “हरवले आहेत” अशा आशयाचे पोस्टर झळकवण्यात आले आहेत.

महापालिकेत आपला महापौर बसवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली असताना ठाकरे गटाचे चार शिलेदार अचानक गायब झाले.त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्याने अखेर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कोळशेवाडी पोलिस ठाण्यात  लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, “तक्रार देऊनही पोलिस प्रशासन सुस्त असून, नगरसेवकांचा शोध घेण्यास टाळाटाळ केली जात आहे,” असा गंभीर आरोप पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.

याबाबत खा. संजय राऊत यांनी “आमच्या नगरसेवकांना दबावाखाली किंवा प्रलोभनाखाली पळवून नेले जात असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. पोलिसांनी तातडीने त्यांचा शोध घ्यावा, अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने कारवाई करावी लागेल.” असा इशारा दिल्यानंतर आज कल्याण पूर्व भागात ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. बेपत्ता नगरसेवकांचे फोटो असलेले पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. “कुणालाही हे नगरसेवक आढळून आल्यास शिवसेना शाखेशी संपर्क साधावा,” असे आवाहन या पोस्टर्सच्या माध्यमातून करण्यात आले आहे. या अनोख्या आंदोलनामुळे नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

———

   कुटुंबीयामध्ये अस्वस्थता

 राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच, दुसरीकडे या 4  नगरसेवकांचे कुटुंबीय आणि नातेवाईकही चिंतेत आहेत.त्यांचा जीव धोक्यात असल्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त होत असून, पोलिसांनी तातडीने तपास करण्याची मागणी केली जात आहे. सत्तास्थापनेच्या खेळात या नगरसेवकांचे नक्की काय झाले? ते स्वतःहून बाहेर गेले आहेत की त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे?  या राजकीय ‘बेपत्ता’ नाट्याचा शेवट कसा होतो आणि ते कधी  प्रकट होतात?, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

Post Views: 43
Previous Post

२५ व्या अखंड हरिनाम सप्ताहाचा भव्य सोहळा; महिला ग्रामसंघाचा उत्स्फूर्त सहभाग

Next Post

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी चे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकी चे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

ताज्या बातम्या

सिद्धेश्वर कन्या, मेहता व संगमेश्वर अव्वल क्रीडा स्पर्धेतील कामगिरीवर प्रोत्साहनात्मक अनुदान

April 29, 2026

शक्तीपीठ महामार्गाविरोधात वेळापूर येथे उद्या राजू शेट्टींच्या उपस्थितीत जाहीर निषेध सभा

April 29, 2026

२ मे पासून शाळांना सुट्टी ;१५ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष

April 29, 2026

मागच्या भांडणातुन रागाने सासू, सून आणि मुलास रॉडने मारहाण

April 29, 2026

एकशे अकरा रिक्षा चालकांना ओळखपत्र

April 29, 2026

साखरपेठ गारमेंट सेंटरला लागली मोठी आग तासात मिळवले नियंत्रण

April 29, 2026

कुंभारीत शेतकऱ्याची गळफासाने आत्महत्या

April 29, 2026

गड्डा यात्रा आणि लग्नात चोरी करणाऱ्या महिलांना अटक

April 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0836406

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697