सोलापूर – महावीर हायस्कूल होटगी रोड सोलापूर मध्ये सजग वाचन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्य शाळेत सजग वाचन म्हणजे काय, वाचन का करावे, वाचण्यासाठी योग्य पुस्तके ओळखणे.योग्य वाचन तंत्र, वाचना तील अडथळे दूर करण्याच्या युक्ती, वाचन वेग जाणून घेणे आणि वाचन वेग कसा वाढवावा, स्मरणशक्ती वाढवणारे खेळ याविषयी मार्गदर्शक माधुरी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
प्रारंभी प्रशालेच्या मुख्याध्यापिका उज्वला पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सक्षम ग्रंथालयासाठी प्रयत्न करणे यासह अनेक गोष्टीवर मनमोकळे पणाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका उज्वला पाटील होत्या.
सदर कार्यशाळेत शिक्षक विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन बसवराज बिराजदार यांनी केले.























