सोलापूर : श्री भगवतीमाता मंदिर, सोलापूर येथे सद्गुरु प. पू. जयदेवराव पाटील महाराज यांची ३९ वी पुण्यतिथी मंगळवार, दि. २४ नोव्हेंबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी होणार आहे.
या निमित्त मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ६:०० ते ८:०० या वेळेत श्री देवी मातेस अभिषेक व पूजा होईल. त्यानंतर सकाळी ८:०० ते १०:०० या वेळेत सद्गुरु श्री जयदेवराव पाटील महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक, पूजा आणि समाधी पूजन पार पडेल. सकाळी १०:३० वाजता समाधी स्थळी पारंपरिक गुलालाचा कार्यक्रम होणार असून, रात्री ९:०० वाजता देवी मातेची आरती व छबिना मिरवणूक निघेल.
तरी सर्व भक्तांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





















