करकंब : महाशिवरात्र व कलश वर्धापन दिनानिमित्त बार्डी येथील महादेव मंदिरामध्ये शुक्रवार दि.६फेब्रुवारी ते सोमवार दि.१६ फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहानिमित्त नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार, हरीजागर, काकडा अशा अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून बळीराम व्यवहारे,आदेश घाडगे,कृष्णा शिंदे,शिवाजी पवार,तुकाराम भोसले,बाबासाहेब उगले,प्रकाश कापसे,श्रीहरी साळुंखे,हनुमंत जाधव,रुद्र पवार या महाराष्ट्रातील दिग्गज प्रवचनकारांची प्रवचने तसेच सूर्याजी भोसले,ज्ञानेश्वर कदम आळंदी,विनोदाचार्य सोपान इंगळे बीड,अंकुश रणखांबे अकलूज,ज्ञानसिंधू सागर बोराडे नातेपुते,गायनाचार्य कविराज झावरे पारनेर,विद्यावाचस्पती जलाल सय्यद नाशिक,गुरुवर्य उल्हास सूर्यवंशी देवाची आळंदी,मोहन पाटील, सांगली,सतीश कदम आष्टा हे महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तनसेवा करणार असून काल्याची किर्तनसेवा गुरुवर्य सुधाकर महाराज इंगळे सोलापूरकर यांची होणार आहे.तरी बार्डी व परिसरातील सर्व शिवभक्तांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
























