Saturday, May 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी लोकशाहीची पायाभरणी केली : प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा

तरुण भारतbyतरुण भारत
February 4, 2026
in solapur
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात ‘अनुभव मंटप’ स्थापन करून लोकशाही विचारांची प्रभावी पायाभरणी केली. “काय कवे कैलास” या ब्रीदवाक्यानुसार त्यांनी समता, बंधुता आणि मानवमूल्यांचा पुरस्कार केला. जातीभेद नष्ट करून समानतेची शिकवण देणारे महात्मा बसवेश्वरांचे विचार आजच्या समाजासाठीही तितकेच प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील कन्नड विभाग, भाषा व वाङ्मय संकुल आणि महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यातील कायक-दासोह’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले. उद्घाटनप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते.

यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ अभ्यासक डॉ. बी. बी. पुजारी, डॉ. भीमाशंकर बिराजदार, डॉ. राजशेखर विजापुरे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, भाषा व वाङ्मय संकुलाच्या संचालिका डॉ. अंजना लावंड, अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. चंद्रकांत गार्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. अंजना लावंड यांनी स्वागत केले. महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. चंद्रकांत गार्डी यांनी कार्यशाळेची भूमिका मांडत प्रास्ताविक केले.

प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी आपल्या भाषणात महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यातील सामाजिक, धार्मिक व नैतिक मूल्यांचे सखोल विश्लेषण केले. कायक (श्रम) आणि दासोह (सेवा) या संकल्पनांमधून त्यांनी श्रमप्रतिष्ठा, सामाजिक न्याय व मानवी समतेचा संदेश दिला असून, तो संदेश आजच्या काळात अंगीकारणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यशाळेत डॉ. बी. बी. पुजारी, डॉ. भीमाशंकर बिराजदार व डॉ. राजशेखर सोलापूरे यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची ऐतिहासिक पार्श्वभूमी, वचन साहित्याचे तत्त्वज्ञान आणि त्याचे समकालीन सामाजिक संदर्भ यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. उपस्थित संशोधक, विद्यार्थी व अभ्यासकांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

या कार्यक्रमास वित्त व लेखा अधिकारी सीए महादेव खराडे, डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. प्रशांत पवार, डॉ. वीरभद्र दंडे, प्राचार्य गजानन धरणे, ॲड. मल्लिनाथ शहाबादे, चन्नवीर बंकुर, राहुल पावले, महादेव न्हावकर, डॉ. राजीवकुमार मेंटे, डॉ. शिवानंद तडवळ यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ममता बोल्ली व श्रुती देवळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. गीता डिग्गे यांनी केले.

Post Views: 64
Previous Post

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थिंचे चंद्रभागेत विसर्जन

Next Post

भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचा तीव्र विरोध

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भारतीय रेल्वेच्या खाजगीकरणाला सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचा तीव्र विरोध

ताज्या बातम्या

आता मुलांना मिळणार सर्व लसीकरण #marathinews

May 16, 2026

मनीषा मानेवर दोष निश्चितीला वेळ #solapurnews

May 16, 2026

हडपसर मध्ये बॉम्ब ठेवणारा शिवाजी राठोड सोलापूरचा

May 16, 2026

रोटरीची आशा एक्सप्रेस करणार महिलांच्या मोफत कॅन्सर टेस्ट

May 16, 2026

मुंबई पुणे एक्सप्रेसवर झालेल्या अपघातात संपूर्ण रस्त्यावर रंग विखुरला #viral #marathinews

May 16, 2026

जिल्हापरिषदेच्या सीईओनी केले नो व्हेईकल डे चे आवाहन #solapurnews

May 16, 2026

इस्लापूर येथे जलजीवन मिशनच्या मेन लाईनला गळती #marathinews

May 16, 2026

कळंब येथे बिर्याणी सत्याग्रह अनोखे आंदोलन #marathinews

May 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0867054

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697