वळसंग – पोलीस ठाणे हद्दीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने 107 मतदान केंद्रावरती लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.
वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारी येथील शाळा परिसरात मोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रिया पार पडली. या ठिकाणी एकूण २२ मतदान बूथ असून सुमारे २२,००० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावायचा असल्याने पोलिस प्रशासनाने अत्यंत काटेकोर नियोजन करून उत्कृष्ट व्यवस्थापन राबविले.
मतदान केंद्र परिसरात बॅरिकेटिंग, प्रत्येक बूथनिहाय मतदारांसाठी वेगळे प्रवेश व निर्गमन मार्ग, स्पष्ट दिशादर्शक फलक, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच ड्रोनद्वारे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. सर्विस रोड बंद ठेवून वाहतूक नियंत्रणात ठेवण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी इलेक्ट्रिक व्हेईकल व व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे सर्व मतदारांनी अत्यंत सुव्यवस्थित, शांत व निर्भय वातावरणात मतदान केले.
या यशस्वी व्यवस्थापनासाठी पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. यावलकर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. यामावार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली वळसंग चे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे,इतर पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी दक्षता व शिस्तबद्ध पद्धतीने काम करून मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडली.


















