सोलापूर – बार असोसिएशन यांच्या वतीने दि. 15 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता बार असोसिएशन हॉल येथे संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या महान कार्याचा व समाज प्रबोधनाच्या विचारांचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारचे अध्यक्ष ॲड. बाबासाहेब जाधव तसेच उपाध्यक्ष ॲड.रियाज शेख, सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे, खजिनदार ॲड. अरविंद देडे उपस्थित होते. यावेळी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे विद्यमान सदस्य ॲड. मिलिंद थोबडे, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंग रजपूत, माजी अध्यक्ष ॲड. संतोष न्हावकर, माजी उपाध्यक्ष ॲड. असीम बांगी आदी मान्यवर यांनी मनोगत व्यक्त केले.
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त आयोजित हा अभिवादन सोहळा सोलापूर बार असोसिएशनच्या सामाजिक व सांस्कृतिक बांधिलकीचे प्रतीक ठरला असून, उपस्थित वकील बंधू-भगिनींमध्ये प्रेरणा व ऐक्याची भावना निर्माण करणारा ठरला.
यावेळी सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संत सेवालाल महाराज यांच्या समाजहितवादी कार्याचा, एकात्मतेच्या संदेशाचा व मानवतेच्या मूल्यांचा गौरव करत त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बारचे सचिव ॲड. बसवराज हिंगमिरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी सरकारी वकील ॲड. रमेश राठोड यांनी उपस्थित सर्व मान्यवर, वकील बंधू-भगिनी व आयोजकांचे आभार मानले.
या प्रसंगी वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






















