Thursday, June 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तीर्थक्षेत्र माचणूर येथे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी

तरुण भारतbyतरुण भारत
February 16, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंगळवेढा – तीर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आंध्र,कर्नाटक,महाराष्ट्र,गोवा आदी राज्यातून लाखाच्या जवळपास भाविकांनी हजेरी लावून मनोभावे दर्शन घेतले. दरम्यान पहाटे पाच वाजता प्रांताधिकारी बी.आर माळी, तसेच तहसिलदार मदन जाधव व त्यांच्या सौभाग्यवती निशा जाधव यांच्या हस्ते श्री ची पुजा करुन दुग्धाभिषेक केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खूले करण्यात आले. हर हर महादेव च्या जयघोषाने पहाटेपासून मंदिर परिसर दणाणून गेला होता.

सोलापूर पासून 40 कि.मी.,मंगळवेढ्यापासून 14 कि.मी. अंतरावर भीमा नदीच्या कडेकपारीत भव्य असे हेमाडपंथी माचणूर येथे श्री सिध्देश्वराचे पुरातन मंदिर असून प्रतिवर्षी महाशिवरात्रीला येथे 5 दिवस यात्रा भरली जाते. यात्रेनिमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते.

महाशिवरात्रीदिवशी माचणूर गावातील श्री ची पालखी सायंकाळी मंदिराकडे येते व या पालखीचा मंदिरात 5 दिवस मुक्काम असतो, पाचव्या दिवशी पुन्हा श्री ची पालखी माचणूर गावाकडे मार्गस्थ होते. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी भीमा नदीत पहाटे स्नान करुन काही भक्तांनी ओल्या पडद्याने दर्शन घेतले. मंदिर परिसरात मेवा मिठाई,रसपानगृह,स्टेशनरी दुकाने, नारळ,फुल विक्रेते , विविध पाळणे व अन्य छोटीमोठी दुकाने परिसरात थाटली आहेत.

कर्नाटक,आंध्र,महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यातून लगत असलेल्या सोलापूर,मोहोळ,पंढरपूर,सांगोला व अन्य भागातून दिवसभर दर्शनासाठी भाविकांची रिघ असल्याने लांबलचक मंदिरात भाविकांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. श्री च्या पालखीचे आगमन झाल्यानंतर सायंकाळी मंदिर परिसरात आरत्याचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नवसापोटी भाविकांनी पेढा,साखर आदींचे वाटप करुन आनंद व्दिगुणीत केला. काही भाविकांनी नवसापोटी मंदिराच्या वेशीपासून ते नदी पर्यंत प्रत्येक पायरीला नारळ फोडून आपले बोललेले नवस पुर्ण केल्याचे दिसून येत होते. मंगळवेढा एस.टी.आगाराने माचणूर यात्रेसाठी ज्यादा गाड्या सोडून भाविकांची सोय केली होती. पंचक्रोशीतील भाविक हे पारंपारिक पध्दतीने बैलांना रंगवून त्यांच्यावर झुल घालून बैलगाडीतून कुटूंबासह दर्शनाला येत असल्याचे चित्र होते. काही भाविकांनी मोटर सायकलवर कुटूंबासह येणे पसंत केले. दरम्यान यात्रेसाठी डी.वाय.एस.डी.डॉ.बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी पोलीस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक तीन,एस.सी.बीचे एक पथक,वाहतूक शाखेचे दहा पोलीस पथक,तीस अंमलदार, 15 होमगार्ड,आर.सी.पी.प्लॅटून एक राखीव फोर्स असा पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला होता. कुठेही अनुचित प्रकार न घडता यात्रेचा पहिला दिवस शांततेत पार पडला.

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी श्री सिध्देश्वराचे मनोभावे दर्शन घेवून महापालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणूका शांततेत पार पाडल्या. भविष्यातही जिल्ह्यात शांतता नांदो अशी श्री सिध्देश्वराला प्रार्थना केली.

फोटो ओळी

श्री सिध्देश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी लावलेली रिघ छायाचित्रात दिसत आहे. (छाया- प्रथमेशराजे,मंगळवेढा)

पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचा देवस्थानच्यावतीने सत्कार करताना देवस्थानचे पुजारी छायाचित्रात दिसत आहेत. (छाया-प्रथमेशराजे,मंगळवेढा)

Post Views: 50
Previous Post

तोरणी व अरळी येथे जल अर्पण दिवस साजरा     

Next Post

संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त विचारांचा गौरव

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त विचारांचा गौरव

ताज्या बातम्या

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष प्रयत्न – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 11, 2026

कन्यादान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

June 11, 2026

ॲट्रॉसिटी अंतर्गत खून प्रकरणातील वारस शोध मोहीम

June 11, 2026

एनसीएमसी स्मार्ट कार्ड शिबिराचा २५२ जणांनी घेतला लाभ

June 11, 2026

सोलापूरला मिळणारे पाणी पूर्णपणे सुरक्षित; एनएबीएल मान्यताप्राप्त प्रयोगशाळेच्या अहवालातून शिक्कामोर्तब

June 11, 2026

राजकीय वैमनस्यातून मारहाण केलेल्या आरोपींची अपिलात जिल्हा न्यायालयाकडून शिक्षा कायम

June 11, 2026
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६ तातडीने लागू करा ! – राष्ट्रभक्त अधिवक्ता संघटना

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६ तातडीने लागू करा ! – राष्ट्रभक्त अधिवक्ता संघटना

June 11, 2026

बारलोणी येथे बहिणीला भेटायला आलेल्या भावास मारहाण

June 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0904470

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697