दक्षिण सोलापूर – बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती मंद्रूपमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. नाईक नगर तांड्यातील बंजारा समाज बांधवांकडून सेवालाल महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सरपंच अनिता कोरे , माजी जिल्हा परिषद सदस्या विद्युलता कोरे, माजी पंचायत समिती सदस्या शालन चव्हाण , ग्रामपंचायत सदस्या शांताबाई चव्हाण , उपसरपंच भगवान व्हनमाने, जिल्हा दूध संघाचे माजी संचालक प्रभाकर कोरे व माजी ग्रामपंचायत सदस्य अमृत चव्हाण यांच्या हस्ते सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी कारभारी खुबा चव्हाण, नाईक अर्जून चव्हाण, दक्षिण सोलापूर संजय गांधी निराधार योजेनेचे माजी अध्यक्ष प्रशांत कडते, बाळासाहेब चव्हाण, शिवाजी चव्हाण, विलास चव्हाण, कस्तुर चव्हाण, बाबूराव चव्हाण, संजय राठोड, महादेव पवार, विनोद चव्हाण यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते. यावेळी महाप्रसाद वाटप करण्यात आले.






















