पंढरपूर – तालुक्यातील आंबे येथील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारच्या आपल्या पंढरपूर दौऱ्यात तनपुरे महाराज मठ येथे भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी राज्य शासनाच्या वतीने प्रत्येक मृत कामगाराच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या बरोबरच दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक कामगाराच्या कुटुंबातील मुलाला नोकरी मिळवून देण्याची आणि मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः घेतली.या माध्यमातून दुर्घटनाग्रस्त कुटुंबांना आर्थिक आधार देण्यासोबतच त्यांच्या मुलांच्या भविष्याची काळजी घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आमदार राजू खरे, आमदार अभिजीत पाटील, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा प्रशासन अधिकारी नगरपालिका आशिष लोकरे, नगराध्यक्ष प्रणिती भालके, मुख्याधिकारी महेश रोकडे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमित निमकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
————————-
चौकट : ( महापुजे नंतर धनादेशाचे होणार वितरण )
दरम्यान ही मदत २१ नोव्हेंबर २०२६ रोजी कार्तिकी यात्रेच्या शासकीय महापूजेनंतर आयोजित कार्यक्रमात संबंधित कुटुंबांना धनादेशाद्वारे वितरित करण्याबाबत देखील जिल्हा प्रशासनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचना दिल्या.
Views: 15